उपस्थित मान्यवरांनी बालकलाकारांना दिली शाबासकीची थाप
गंगाखेड प्रतिनीधी(महेमुद शेख)
गंगाखेड(दि.9फेब्रुवारी):-शहरातील फर्स्ट आयडिया इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूल येथे दि.8 फेब्रुवारी बुधवार रोजी बालकला महोत्सव 2023 मोठ्या आनंदोत्सवामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला..कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी त्यांना पाठीवर शाबासकीची थाप मिळावी यासाठी प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी गंगाखेड शहरातील फर्स्ट आयडिया इंटरनॅशनल प्री प्रायमरी स्कूल या शाळेचा बालकला महोत्सव कृष्णश्रेया मंगल कार्यालय राजवाडा येथे साजरा करण्यात आला.
या बालकला महोत्सवामध्ये गोकुळ चिंतामणी सेमी इंग्लिश बालक मंदिर तसेच कराड इंटरनॅशनल स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा डान्सच्या माध्यमातून आपल्या कलेचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते तथा गंगाखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय सुपेकर, कार्यक्रमाचे उद्घाटक मा.नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.नगराध्यक्ष जयश्री मुंडे,मा.केंद्रप्रमुख संभाजी वाडेवाले,केंद्रप्रमुख शिवाजी फड,कराड इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक गणेश कराड,रवी जोशी,लक्ष्मीकांत जबदे,रुक्मिणी-उत्तम संस्थेच्या सचिव गवळण कराड,पत्रकार महेमुद शेख यांची उपस्थिती होती यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास पालकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे संचालक देवानंद उर्फ बापू जोशी,गणेश कराड,मुख्याध्यापक रुपाली जोशी(मोहरील),वैशाली सराफ,जयश्री शेटे,अंबिका गळाकाटू,रिहाना शेख,सोनम शेख,सनोबर शेख,रेणुका वाघे आदी शिक्षक वृंदानी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली सराफ तर आभार देवानंद जोशी यांनी मानले
