Home महाराष्ट्र ३१ जानेवारी रोजी चिमूर तालुका प्रेस असोशिएशनचे “चिमूर क्रांती भुषण पुरस्कार” होणार...

३१ जानेवारी रोजी चिमूर तालुका प्रेस असोशिएशनचे “चिमूर क्रांती भुषण पुरस्कार” होणार वितरीत!

116

🔸तीन गटात होणार शालेय समूह नृत्य स्पर्धा-एकूण ४५ हजार रुपयांची रोख बक्षिसे

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.29जानेवारी):-सामाजीक बांधीलकी जपत शालेय व महाविघालयीन विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना संधी देवून त्यांच्या कलेस हक्काचे रंगमंच उपलब्ध व्हावे या उद्देशाने चिमूर तालुका प्रेस असोशिएशन चिमूरच्या वतिने शालेय समूह नृत्य स्पर्धा संस्कृतीक कार्यक्रम व विवीध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन ३१ जानेवारी मंगळवार ला सायंकाळी ६ वाजता सावित्रीबाई फुले सभागृह अभ्यंकर मैदान चिमूर येथे करण्यात आले असुन या सांस्कृतीक कार्यक्रमात समूहाने विद्यार्थी थिरकनार आहेत.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, कार्यक्रमाचे उद्धघाटक चिमूर विधान सभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडीया, विशेष अतिथी माजी जिप अध्यक्ष डॉ सतिश वारजूकर, प्रदेश संघटक महा. प्रदेश कॉंग्रेस कमेटी ओबीसी धनराज मुंगले, राष्ट्रवादी कॉंग्रेस चंद्रपूर जिल्हा सरचिटनीस अरविंद रेवतकर, विदर्भ समन्वयक वंचित बहुजन आघाडी अरविंद सांदेकर, प्रमुख अतिथी ब्रम्हपूरी विभागाचे उपवन संरक्षक दिपेश मलहोत्रा, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे, मुख्याधीकारी डॉ सुप्रीया राठोड, पोलीस निरीक्षक मनोज गभणे, वैद्यकीय अधिक्षक डॉ अश्विन अगडे, गटविकास अधिकारी राजेश राठोड, एकालीक बाल विकास प्रकल्प अधिकारी पुनम गेडाम, सा.बा.प्रभारी सहायक अभियंता समीर उपगंलावार, एमारसईबी सहायक अभियंता संजय जळगावकर, तालूका कृषी अधिकारा ज्ञानदेव तिखे, खडसंगी बफर वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे आदी मान्यवर उपस्थीत रहानार आहे.

कार्यक्रमादरम्यान या वर्षांचा निर्भिड पत्रकार पुरस्कार कबीरा एक्सपोज चे लिमेशकुमार जंगम, दैनिक सकाळ चे जिल्हा प्रतिनीधी प्रमोद काकडे यांना देन्यात येनार असून कोरोना काळात शहरात विशेष सेवा देनाऱ्या सामाजीक संस्था, महसुल विभाग, आरोग्य विभाग, आशावर्कर, अंगणवाडी कर्मचारी नगर परिषद आणि शहरातील टिपू सुलतान फाउंडेशन, तरुण पर्यावरण मंडळ शंकरपूर यांचा सत्कार होनार आहे.या वर्षाचा स्वातंत्र संग्राम सैनिक तथा माजी संपादक स्व. दा ल काळे गुरुजी स्मृती पुरस्कार राजकुमार चुनारकर चिमूर क्रांती भुषन पुरस्कार डॉ ज्ञानेश्वर जुमनाके, निकीता देवचंद टेंभूरकर, दिपक पिसे, प्रसाद ज्ञानेश्वर शिरभैय्ये शुभम राजेंद्रप्रसाद भगत यांना देन्यात येत आहे. त्यानंतर शाळा, महाविद्यालयातील विजेत्या समूह स्पर्धकांना दानदात्या मार्फत बक्षीस वितरण करन्यात येनार आहे.परिसरातील नागरीकांनी या कार्यक्रमाला उपस्थीत रहाण्याचे आवाहन चिमूर तालुका प्रेस असोशिएशनने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here