Home महाराष्ट्र हळदी-कुंकू कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद

हळदी-कुंकू कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद

173

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.22जानेवारी):-सौ.रेखाताई रत्नाकरराव गुट्टे यांनी महिलांना सौभाग्याच लेन म्हणुन प्रत्येकाच्या घरात शुभता राहावी या उद्देशाणे राजहंसकुंकू करंडा वान म्हणुन विठ्ठल रुक्मीनीच्या साक्षिने संत जनाबाई मंदीरात भावपुर्ण वातावरणात देण्यात आला

मकर संक्रांतीचे औचित्य साधून शहरातील संत जनाबाई मंदिरात आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमास महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. पारंपारिक गाणी आणि उखाणे यामुळे कार्यक्रम रंगला होता. याप्रसंगी उपस्थित महिलांना रेखाताई गुट्टे यांच्या हस्ते सुमारे 7 हजार महिलांना वाण म्हणून राजहंस कुंकू करंडा वान देण्यात आला.

अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या देखण्या कार्यक्रमाच्या आयोजनात गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या सुविद्य पत्नी सौ. रेखाताई गुट्टे यांनी अतिशय नेटके नियोजन केले होते. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह संचारला होता. तसेच ‘तीळ-गुळ घ्या आणि गोड-गोड बोला’ हा संदेश सुध्दा देण्यात आला.

हिंदू परंपरेत मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात हळदी कुंकू समारंभ साजरे केले जातात. त्यानिमित्ताने महिलांचे संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने हा हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केल्याचे मुख्य आयोजिका रेखाताई गुट्टे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.दरम्यान, महिलांच्या जिव्हाळ्याचा नाविन्यपुर्णअसा हळदी कुंकू‎ कार्यक्रम केल्यामुळे रेखाताई गुट्टे यांच्यावर महिला कौतुकाचा वर्षाव करत होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here