Home पुणे वंचित बहुजन आघाडी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा राजगुरुनगर येथे संपन्न

वंचित बहुजन आघाडी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा राजगुरुनगर येथे संपन्न

207

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे जिल्हा प्रतिनिधी)

पुणे(दि.16जानेवारी):-वंचित बहुजन आघाडी खेड तालुक्याच्या वतीने राजगुरूनगर शहरामध्ये चंद्रमा गार्डन येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि कार्यकर्ता मेळावा नुकताच संपन्न झाला खेड तालुक्यामध्ये आदिवासी / भटके विमुक्त / बहुजन समाजाचे लोक जास्त प्रमाणात राहत असल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आजपर्यंत ज्या प्रस्थापित पक्षांनी मायक्रो कम्युनिटीना सत्तेपासून वंचित ठेवलं अशा सर्वांना राजकारणामध्ये सत्ता मिळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका अशा ठिकाणी उमेदवारी देऊन या लोकांना सत्ते मध्ये सहभागी करणार आहे असे आदरणीय बाळासाहेबांच स्वप्न आहे ते आपल्या सर्वांना पुर्ण करायचे आहे.

शिवाय सर्व बहुजन समाजाने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडी च्या झेंड्याखाली येऊन सर्वांनी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र यावे असे आवाहन पुणे जिल्हा पूर्वचे जिल्हा अध्यक्ष राज कुमार साहेब यांनी केले. तसेच खेड तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी गावागावापर्यंत पोहोचवून गाव तिथे शाखा स्थापन करून वंचित बहुजन आघाडी खेड तालुक्यामध्ये प्रसारित करणार असा निर्धार नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष महेंद्र नाईकनवरे यांनी केला. तसेच खेड तालुक्यामधील सर्वच गावांमधील बुथबांधणी येणाऱ्या निवडणुकांमध्ये पूर्ण झालेली असेल अशी जबाबदारी खेड तालुक्याचे नेते व युवा उद्योजक दत्ताशेठ कांबळे यांनी घेतली.

या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हा अध्यक्ष राज कुमार साहेब व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रबोधनकार सुधाकर अभंग यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित मा. राज कुमार – अध्यक्ष पुणे जिल्हा पूर्व, नवनाथ गायकवाड – महासचिव, मा. सीमाताई भालेसाईन – अध्यक्षा पुणे जिल्हा महिला आघाडी, सुजय रणदिवे – संघटक, गोविंद कांबळे – सहसचिव, सतीश साळवे – सहसचिव, बाळासाहेब मोरे, प्रियंकाताई लोंढे, जावेद मोमीन, नंदाताई गवारी, सचिन साबळे, यशवंत थोरात, भीमराव गायकवाड, दिनेश गोतरणे, विकास रोकडे, धीरज कांबळे, गणेश गायकवाड, पवन थोरात, गणेश भोसले, मारुती शिंदे, दिनेश बचुटे, गौतम वाव्हळ, मनोहर सुर्वे, रंगनाथ ओव्हाळ, बाळासाहेब ओव्हाळ, संतोष गायकवाड, संतोष साबळे, रामदास गंगावणे, गोविंदराव शिंदे, नामदेव वाघचौरे, सुनील बनसोडे, चंद्रसेन गोतारने, भीमराव वाघचौरे, आकाश कांबळे, प्रदीप गायकवाड, सोमनाथ त्रिभुवन, राहुल तूपारे, शिवाजी ससाने, अनिल गंगावणे, विजय दूधवडे , संदेश लगाडे, रोहिदास रणपिसे, महिंद्र रणपिसे, मनोहर भालेराव, भगवान सोनवणे, संतोष हटाळे, विशाल कांबळे, तुषार सोनवणे, आनंद साबळे, गौतम रोकडे, राहुल खंडारे, सुनील कदम, जुन्नर तालुका अध्यक्ष गणेश वाव्हळ, महासचिव सागर जगताप यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सुरकुंडी गावचे लोकनियुक्त सरपंच कल्पनाताई मयूर लोखंडे, उपसरपंच प्रदीप तायारामा पऱ्हाड – ग्रामपंचायत सदस्य, सुरेश सुपे, चतुरा लोखंडे, सारिकाताई ओव्हाळ, चंद्रकांत वाजे आदी ग्रामपंचायत सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. अशोक कडलक साहेब यांनी मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती मध्ये पत्रकार काळुराम घोडके, गौतम लोखंडे, अनिकेत गोरे, डॉ. देवेंद्र ओव्हाळ, सुनील वाघचौरे आदी पत्रकार बांधव आवर्जून उपस्थित होते.

विशेष म्हणजे जिल्हा अध्यक्ष राज कुमार साहेब आणि त्याच्यासमवेत आलेल्या मान्यवरांनी एकत्र सहभोजनाचा लाभ घेऊन कार्यक्रम आनंदात संप्पन झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here