Home महाराष्ट्र गुलाबराव पाटील मंत्री कि मांत्रिक?

गुलाबराव पाटील मंत्री कि मांत्रिक?

145

बाळासाहेब ठाकरे आमचे बापाच्या जागी आहेत.हम बाप नही बदल सकते.काय राव! दोनच दिवसात बदलून मोकळे झाले.पळाले गुवाहाटी.ठाकरेंसोबत असतांना बाळ ठाकरे,उद्धव ठाकरे यांची आरती करणारे अचानक कसे काय बदलले? आत बदलणे,जात बदलणे, शब्द बदलणे, पक्ष बदलणे,बाप बदलणे खूप सोपे करून टाकले.हाड्या घाला कारभारी आणि गु लई ग्या दरबारी.अशी म्हण आन्देशी भाषेत प्रचूर आहे.मंत्री पद थट्टेचा विषय करून टाकला.
कालच जळगाव चे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्रमात हजेरी लावली.यांनी का बोलवले?तेच कळत नाही.पण आले.काय काय बोलले?काय काय आश्वासन दिले? काय काय शुभेच्छा दिल्या? ऐकून वाटते कि मंत्री बोलले कि मांत्रिक ?काय गुलाबराव? तुम्ही मंत्री आहात कि मांत्रिक? काहीतरी बोलून, करमणूक करून वेळ मारून नेली.अहो, गुलाबराव,एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत.ते दाणापाणी च्या समस्येत आहेत आणि तुम्ही मारे खाऊन पिऊन त्यांच्या पूढे भाषणे ठोकतात.

उपदेशाची.तुम्ही खाऊन पिऊन धट्ट होऊन बिचाऱ्या अर्धपोटी कामगारांना कोणता आशिर्वाद देतात?कोणता उपदेश करतात?असे भुकेल्या पोटी कोणते तत्वज्ञान ऐकायला लावतात? मंत्री आहात.सरकार मधे बसले आहात.तर सभामंडपातूनच मुख्यमंत्री शिंदेंना फोन लावा.” शिंदे साहेब, तुम्ही म्हणता पैसा कमी पडू दिला जाणार नाही.आणि इकडे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार बंद.चुला बंद.डोस्क बंद.शाळा बंद.दवाखाना बंद.हे ठिक नाही.तुम्ही काळ्या चोराचे घर फोडा पण आत्ताच यांचे पगार देण्याचे आदेश करा.शिंदेसाहेब, माझ्या अवतीभोवती पोलिस आहेत नाहीतर,हे भुकेले लोक जोड्याने मारतील.”

ठाकरे मुख्यमंत्री असतांना याच एसटी कामगारांनी सहा महिने संप केला.आणि हेच गुलाबराव पाटील तेंव्हा कैबीनेट मंत्री होते.ठाकरेंचे जवळचे होते.एकाच तागेतून झगा शिवत होते.दोघांचा रंग एकच.भगवा.म्हणजे त्याग,दया,धर्म.एकाच करंडातून कुंकू लावत होते.तर मग, ठाकरेंनी इतके ऐकले नसते का? ” ठाकरे साहेब, तुम्ही बगल वर करून खूप इकडची तिकडची ठोकतात.पण आपल्या मंत्रालयाजवळच एसटी कामगार भुकेले बसले आहेत.जे काही द्यायचे ते द्या किंवा नका देऊ.पण यांना एक वेळ भेट तर द्या.तितकी तर माणुसकी दाखवा.”

जर ठाकरेंनी तरीही ऐकले नसते तर गुलाबराव पाटील स्वतः तरी संपकऱ्यांना जाऊ भेटले असते.” मित्रांनो,कोणी तुमच्या सोबत असो नसो ,पण हा गुलाबराव तुमच्या सोबत आहे.कोणी नाही ऐकले तरी मी आहे तुमचे ऐकणारा.मी गरीबाचे लेकरू आहे.मी गरीबी पाहिली आहे.अनुभवली आहे.भुक काय असते,मला जाणवली आहे.तुम्ही इतके दिवस येथे भुकेले बसले आहात.मला खूप वाईट वाटते.साला माणूस, सत्तेवर आला कि माणसांना जनावर समजतो.पण मी तसा नाही.मला सहन होत नाही,यार हे! च्या आयला, मंत्री पद गेले तेल लावत.मी येथेच बसतो.तुमच्यासोबत.दखी लिसू,जे हुईन ते!”
पण ही माणूसकी गुलाबराव पाटील तुम्ही दाखवली नाही.शिंदेंनी काय कुल्फी दाखवली,ढुंकणाला पाय लावत पळाले, गुवाहाटी.ते भी ,अम्ब्युलन्स मधून.ही तर कमालच केली.

पण ही कमाल पळपुटी होती.बहादुरीची नव्हती.बहादुरी ती होती,जर तुम्ही कामगारांसाठी सरकार विरोधात दंड ठोकून बंड केले असते.मग आम्ही जळगाव च्या लोकांनी म्हटले असते.” जळगावची मैदानी तोफ आहे.” पण तुम्ही तर कलाकार निघाले.वारा पाहून उपणतात.कधीतरी मंत्री सारखे वागा.कलाकार सारखे काय वागता?

मी आपणास समक्ष भेटून सांगितले कि,” भाऊ तुम्ही आता आमदार आहात.आमदार सारखे वागा.नंतर मंत्री बनले.तर घरी येऊन सांगितलं कि,आता मंत्री सारखे वागा.दिलेल्या शब्दाला जागा.कमीशन घेणे तुमचा हक्क आहे पण कधीतरी काही न घेता ही कामे करा.भ्रष्टाचार करणे तुमचा अधिकार आहे.पण अति झाले तर थांबा.पुन्हा पुन्हा ठोकल्याने कल्हई उतरते.म्हणून जमेल तितकेच बोला.”

सांगतो ऐका!नाटक,तमाशा,जलसा,जादूगिरी,गारूडी ,साधूगिरी, भोंदूगिरी घडीघडी एकाच ठिकाणी चालत नाही.म्हणून इस तिस गाव गाव फिरावे लागते.पण नेत्याचे तसे नसते.खरे पटेल, तितकेच बोलावे लागते.निभी तितलच बोलाणं,पची तितलच खावाणं!

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here