Home महाराष्ट्र न्यू राष्ट्रीय विद्यालयाची विद्यार्थीनी कु.नयन गुणवंत ठाकरे हिचे विज्ञान प्रतिकृतीची राज्य स्तरिय...

न्यू राष्ट्रीय विद्यालयाची विद्यार्थीनी कु.नयन गुणवंत ठाकरे हिचे विज्ञान प्रतिकृतीची राज्य स्तरिय निवड

124

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमूर प्रतिनिधी)

चिमूर(दि.12जानेवारी):-येथील न्यू राष्ट्रीय विद्यालय चिमूरची वर्ग १० वा ( क) ची विद्यार्थीनी कु.नयन गुणवंत ठाकरे हिने जिल्हास्तरिय ईन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शन सन २०२१-२२ या स्पर्धेमध्ये सहभाग घेवून “कापूस वेचणी यंञ” या विज्ञान प्रतिकृतीचे सादरीकरण करून सुयश मिळवले आता या प्रतिकृतीची राज्यस्तरावर निवड झालेली आहे.

ही प्रतिकृती तयार करण्यासाठी शाळेचे विज्ञान व गणित विषयाचे शिक्षक प्रशांत लढी,घनश्याम गायधनी व वॆष्णवी बोढे यांनी तिला मार्गदर्शन केलेले आहे.तिच्या सुयशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुनिल खोब्रागडे,पर्यवेक्षक उज्ज्वल नव्हाते,सर्व व्यवस्थापक मंडळ,सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन केलेले आहे. आपल्या सुयशाचे श्रेय ती शाळेचे शिक्षक व आईवडिलांना देते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here