Home महाराष्ट्र डी टी आंबेगावे आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित!

डी टी आंबेगावे आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित!

116

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.4जानेवारी):-प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांना आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल ॲवार्ड २०२३ चा आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्कार डी. टी. आंबेगावे यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी डॉ. विक्रम शिंगाडे, डॉ सुमित्रा पाटील, प्रकाश कदम, दत्तकुमार पाटील, सुप्रिया पाटील, नितीन शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते.प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असल्याची दखल घेऊन आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यापूर्वी डी टी आंबेगावे यांना राष्ट्रीय, राज्य, विभागीय अशा विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्काराबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभागीय, जिल्हा,तालुका पदाधिकारी व पत्रकार, राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक, आरोग्य, विधी, कृषी, सांस्कृतिक, क्षेत्रातील मान्यवर, शासकीय व निमशासकीय अधिकारी, मित्र व नातेवाईकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here