Home महाराष्ट्र साळवे इंग्रजी विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा

साळवे इंग्रजी विद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा

105

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगांव(दि.4जानेवारी):- आज दि.३ जानेवारी २३ रोजी मंगळवारी साळवे इंग्रजी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त “बालिका दिवस” म्हणून विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. प्र मुख्याध्यापक ए एस पाटील आणि सावित्रीबाई च्या वेशात आलेल्या सावित्रीच्या लेकींच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी वक्तृत्व स्पर्धा, कविता गायनस्पर्धा,एकांकिका स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना ग्रंथ व पेन बक्षिसे देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ प्रतिभा पाटील मँडम होत्या त्यांनी सांगितले की सावित्रीबाई फुलेंनी स्वतः शिकून समाजात वावरताना अनिष्ट रुढी, परंपरा,वाईट चालीरीती झुगारून आधुनिक विचारांचा अवलंब केला आणि परिवर्तनाचा मार्ग स्विकारून मुलींनी व समाजाने ज्ञानाचा उपयोग करावा असे सांगितले. प्रास्ताविक,सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन व्याख्यानमाला प्रमुख एस डी मोरे यांनी केले.

कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये व यशस्वीतेसाठी एस.पी तायडे, ए वाय शिंगाणे,पूज्य सानेगुरुजी प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका वर्षा नेहेते, सारिका नेहेते, कांचन अत्तरदे व सहकारी शिक्षक आणि कर्मचारी यांनी मदत केली व बक्षिसे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here