Home महाराष्ट्र जय महाराष्ट्र महिला संघटना व कांतीकारी साथी च्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जयंती...

जय महाराष्ट्र महिला संघटना व कांतीकारी साथी च्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जयंती विविध उपक्रमाने साजरी होणार – सौ.वर्षा मगर

97

🔹कांतीकारी साथी च्या वतीने होणार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती विशेषांकाचे प्रकाशन

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ प्रतिनिधी)

परळी वैजनाथ(दि.4जानेवारी):-येथील गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जय महाराष्ट्र महिला संघटना, कांतीकारी साथी व आईसाहेब जिजाबाई सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षा प्रमाणे या ही वर्षी हिंदवी स्वराज्याच्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जयंती 12 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या झालेल्या बैठकीत जय महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा व कांतीकारी साथी च्या मुख्यसंपादक सौ वर्षा मगर यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या गेल्या अनेक वर्षांपासून जिजाऊ जयंती निमित्त आपल्या कांतीकारी साथी च्या वतिने जिजाऊ जयंती विशेषांकाचे प्रकाशन होत असते पण मागणी काही वर्षांपासून करोनाच्या महामारीमुळे जयंती विशेषांक प्रकाशित होऊ शकला नाही पण यावर्षी विविध सामाजिक उपक्रमा सोबतच जिजाऊ जयंती विशेषांक प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी या बैठकीला संघटनेचे व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here