Home महाराष्ट्र माजी सैनिक चंद्रकांत गोविंदराव कांबळे मार्ग असे रस्त्यास नाव द्या-जयजवान माजी सैनिक...

माजी सैनिक चंद्रकांत गोविंदराव कांबळे मार्ग असे रस्त्यास नाव द्या-जयजवान माजी सैनिक असोसिएशन ची मागणी

142

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.28डिसेंबर):-येथील माजी सैनिक बुद्धवासी उपा. चंद्रकांत गोविंदराव कांबळे असे रस्त्यास नाव देण्याची मागणी जय जवान माजी सैनिक असोसिएशन पुसद यांच्यावतीने करण्यात आली आहे. पुसद शहर हे पुतळ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यात विविध चौक आणि मार्गाला महामानव व समाजकार्यात अग्रेसर असलेल्या ख्यातीप्राप्त व्यक्तींच्या नावे मार्ग आहेत परंतु देशसेवेमध्ये आपले जीवन अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या नावे मार्ग किंवा रस्त्याला नाव नसल्याची खंत व्यक्त होत होती. त्यामुळे तहसील कार्यालय चौक ते महात्मा गांधी चौक पर्यंतच्या रस्त्यास माजी सैनिक बौद्धवासी चंद्रकांत गोविंदराव कांबळे मार्ग असे नाव देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जय जवान माजी सैनिक असोसिएशन पुसदच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकलवाड यांना करण्यात आली आहे.

माजी सैनिक चंद्रकांत कांबळे यांनी देशसेवा करीत आपली सैनिकाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर पुसद शहरांमधील सामाजिक कार्यात त्यांचा हातखंडा होता. तळागाळातील गोरगरिबांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांची हातोटी असायची. त्यांच्यासाठी चंद्रकांत कांबळे हे अधिकाऱ्यांना जाब विचारायचे त्यांच्यासाठी झगडायचे व न्याय मिळवून द्यायचे. याच त्यांच्या सर्वधर्मसमभावाच्या कार्यामुळे त्यांना सर्व समाजात आदराचे स्थान होते. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या विचारावर आचरणावर आजही तळागाळातील युवावर्ग आदर्श घेत असतात म्हणून त्यांना आजही मानाचे स्थान आहे.

जय जवान माजी सैनिक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी यांना सुद्धा माजी सैनिक चंद्रकांत कांबळे हे आदरणीय आहेत त्यामुळे अशा देशसेवक, समाज सेवक यांचा आदर्श इतरांनी घ्यावा यासाठी तहसील कार्यालय चौक ते गांधी चौक पर्यंत असलेल्या रस्त्यास माजी सैनिक बौद्धवाशी चंद्रकांत गोविंदराव कांबळे असे नाव देण्यात यावे अशी मागणी जय जवान माजी सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश भोसले, भारत कांबळे, अब्दुल वहाब, एन धुळधुळे, प्रकाश पानपट्टे यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here