विशेष प्रतिनिधी(उपक्षम रामटेके)
चिमूर(दि.20डिसेंबर):- मालेवाडा येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष प्रवीण जीवतोडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जी.प. उच्च प्राथमिक शाळा मालेवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो शाळेला भेट म्हणून दिले. त्याचबरोबर शाळेतील मुलांना पेन व नोटबुकचे वितरण केले.
प्रवीण जीवतोडे यांनी ज्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला तो इतरांसाठी नक्कीच प्रेरणा देणारा आहे हे मात्र नक्की. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत त्यांनी सर्व समाजातील अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य जनतेचे राज्य निर्माण केले त्याचे विचार प्रत्येकाने आत्मसात करावे असे शाळेकरी विद्यार्थ्यांना प्रवीण जीवतोडे यांनी मार्गदर्शन केले