Home महाराष्ट्र जि.प.शाळा थोरगव्हाण येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय परिसर स्वच्छ करून विद्यार्थ्यांनी...

जि.प.शाळा थोरगव्हाण येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय परिसर स्वच्छ करून विद्यार्थ्यांनी दिली आदरांजली!…….

107

✒️विशेष प्रतिनिधी(निलेश धर्मराज पाटील सर)

यावल(दि.20डिसेंबर):- यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त शालेय परिसर स्वच्छ करून विद्यार्थ्यांनी दिली आदरांजली वाहीली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश धर्मराज पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव होते. शालेय विद्यार्थी , शिक्षक यांनी प्रतिमा पुजन करून गाडगेबाबांना श्रध्दाजंली वाहीली व त्याच्या कार्याला नमस्कार केला. स्वच्छतेचे महत्व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती च्या सदस्यांनी विद्यार्थ्याना पटवून दिले. शरीर स्वच्छ तर मन स्वच्छ, मन स्वच्छ तर गाव स्वच्छ, गाव स्वच्छ तर जग स्वच्छ. स्वच्छतेची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याना करून दिली.सर्व विद्यार्थ्यानी संपूर्ण शाळा, शाळेतील वर्ग, शालेय आवार व परिसर स्वच्छ केला .

याप्रसंगी शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनोद भालेराव, उपाध्यक्ष संदिप सोनवने सदस्य विनोद पाटील, समाधान सोनवने, पोलीस पाटील गजानन चौधरी व सर्व सदस्य, मुख्याध्यापक महेंद्र देवरे, एकनाथ सावकारे , निलेश पाटील, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार निलेश धर्मराज पाटील यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here