Home महाराष्ट्र मराठा कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

129

🔸पुसद येथे गेल्या नऊ वर्षांपासून मेळाव्याचे यशस्वी आयोजन

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
__________________________
पुसद(दि.20डिसेंबर):- येथील मराठा कुणबी समाज राज्यस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन रविवारी दि.१८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान स्व.शेषराव पाटील जिनिंग-प्रेसिंगच्या भव्य प्रांगणात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याच्या कार्यक्रमाला भारतीय काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील,आमदार ॲड.किरण सरनाईक,माजी मंत्री डाॅ.रणजित पाटील,माजी मंत्री संजय देशमुख,माजी मंत्री सुभाष ठाकरे,माजी आमदार विजय पाटील चोंढीकर,माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर,माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, ज्येष्ठ नेते जीवन पाटील,विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲड.आशिष देशमुख,पुसद अर्बन बॅंकेचे अध्यक्ष शरद मैंद,प्रवीण देशमुख,क्रांती पाटील कामारकर,नाना गाडबैले,तातू देशमुख,राहुल शिंदे,राम देवसरकर,राजश्री पाटील,शिवाजीराव देशमुख सवनेकर,दिगंबर जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद् घाटन सभारंभ प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते परीचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात येणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून मराठा कुणबी समाज,मराठा युवा मंच व मराठा महिला मंडळ यांचेतर्फे आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्यामध्ये प्रकाशीत होणार्‍या परिचय पुस्तिकेमध्ये विदर्भ,मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,कोकणसह राज्यभरातून ४१० उपवधू व ५२० उपवरांची नोंदणी झाली आहे.

जे विवाहोईच्छुक उपवर—उपवधू परिचय देण्यासाठी उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांचेसाठी ऑनलाईन परिचय देण्याची सुविधा करण्यात आली आहे.पहिल्या दिवशी २५७ उपवर,उपवधु चे परिचय देण्यात आले. विशेष म्हणजे नोंदणी झालेल्यामंध्ये शिक्षक,इंजिनिअर,वकील व राजपत्रित अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे.आयोजित मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दीपक काळे,शंकर गावंडे, सुशांत महल्ले यांचेसह पुसद,उमरखेड,महागाव व दिग्रस येथील मराठा कुणबी समाजच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here