Home महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यवतमाळ व पंजाब नॅशनल बँकेने उचलला स्वयंरोजगार...

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यवतमाळ व पंजाब नॅशनल बँकेने उचलला स्वयंरोजगार निर्मितीचा विडा

110

🔸महिला उद्योजकीच्या कंपनीचे उद्घाटनातून उद्योगाला चालना

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)
____________________________
पुसद(दि.19डिसेंबर):-येथील उद्योग जगता मध्ये महिलांचाही सहभाग वाढवा या उदात्त हेतूने हातभार लावण्याच्या दृष्टीने कर्जरूपाने दिलेल्या मदतीतून एमआयडीसी परिसरात महिलेने स्वतःचा उद्योग उभारून रोजगार निर्मितीचा एक आदर्श निर्माण केला आहे. या गणपती ॲल्युमिनियम अँड एम एस पावडर कोटिंग या कंपनीचे उद्घाटन कंपनीचे प्रोप्रायटर सौ कल्पना विनोद गिरी यांनी आपल्या सासू-सासर्‍यांच्या हस्ते पूजनाचा शुभारंभ करीत पंजाब नॅशनल बँकेचे मॅनेजर निलेश भुस्कुटे यांच्या शुभहस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा १२ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पार पडला.

रोजगार निर्मितीच्या कार्यामध्ये महिलांच्या पुढाकाराची बाब या ठिकाणी उल्लेखनीय ठरली. दिवसेंदिवस राज्यात बेरोजगारीची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे युवक वर्ग गुन्हेगारी व व्यसनाधीनतेकडे वळताना दिसत आहे. वेळीच जर आवर घातला नाही तर परिस्थिती अवाक्या बाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचे भान ठेवून, प्रसंगावधान राखून, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यवतमाळ व पंजाब नॅशनल बँक पुसद यांचे संयुक्त विद्यमाने स्वयंरोजगार उभा करणाऱ्यांना आपले खेळते भांडवल आणि स्थिर भांडवल उभे करण्यासाठी कर्ज रूपात अर्थसहाय्य करण्याची पंतप्रधान रोजगार रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ही योजना हाती घेतली आहे.

जेणेकरून रोजगार निर्मिती करून बेरोजगारांना रोजगार देता येईल व आपला बँकिंगचा व्यवसाय देखील चांगला करता येईल. या दुहेरी हेतूने मंडळासह बँकेने दूरदृष्टीने स्वतंत्र व्यवसाय निर्मितीसाठी भांडवल उभारणी करिता विडा उचलल्याचे दिसून येत आहे. हा उपक्रम अतिशय स्तुत्य अभिनंदन असल्याची सर्वत्र चर्चा असून सर्वांनी त्याचे मनापासून स्वागत केले आहे.

पंजाब नॅशनल बँक पुसद चे मॅनेजर निलेश भुस्कुटे व महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ यवतमाळ चे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी गजानन इंगळे हे अतिशय प्रगतशील, कल्पक दूरदृष्टीचे, उद्योगाभिमुख असल्यामुळे अनेक बेरोजगारांसाठी रोजगार निर्मितीची पर्वणी मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या या कल्पकतेला मूर्त रूप देत असल्याचे दिसून येत आहे. जर रिकाम्या हातांना काम मिळाले तर अनेकांचे जीवनमान उंचावेल, आपला उद्योग नीटपणे सांभाळून बँकेचे घेतलेले कर्जदेखील परतफेड करता येईल. छोट्या – छोट्या उद्योगांना लवकर बाजारपेठ मिळते. बाजारपेठ शोधण्याची गरज भासत नाही. त्यामुळे छोटे उद्योग लवकरच भरभराटीला येतात. *हाताला मिळेल काम, कामाचे मिळेल दाम तर सर्वांच्या मनातून खरोखरच नांदेल राम आणि मिळेल गुन्हेगारीला, व्यसनाधीनता, वैफल्यग्रस्ततेला पूर्णविराम.*

उद्योगप्रिय सर्वच बेरोजगारांनी या संधीचे सोने करावे. आपला उद्योग आपण उभारावा, कुटुंबाला, राष्ट्राला हातभार लावावा. रोजगार निर्मितीतून आपले व इतरांचे जीवनमान सुधारावे असे आवाहन पंजाब नॅशनल बँकेचे शाखा व्यवस्थापक निलेश भुस्कुटे यांनी केले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे प्रोप्रायटर यांचे पती विनोद गिरी, मारोती भस्मे, निरज नागठाणे, शिवकरण गिरी, सुशील गिरी, कुलदीप देवसरकर, सुरज बेद्रे, अरुण गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले.

करो, करो, जल्दी गर्व करो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here