Home महाराष्ट्र भाजपामधील भयग्रस्त भिकारी !

भाजपामधील भयग्रस्त भिकारी !

142

अखिल संत, महात्मा, आणि महापुरुषांनी माणूस हा केंद्रबिंदू मानून आपले संपूर्ण जीवन सर्व मानव मुक्ती आणि त्यांचे अस्तित्व टिकवून त्यांच्या कल्याणासाठी व्यतीत केले असल्याने ते निश्चितच धर्म-जात विरहीत सर्व मानवजातीचे आदर्श , श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान असायला हवेत. परंतु ज्यांनी वर्णव्यवस्था प्रमाण मानून जाती व्यवस्थेवर आधारित विषमता निर्माण केली त्यांनी इथल्या महापुरुषांचा आदर करणे अशक्यप्राय गोष्ट आहे.मात्र ज्यांचे मानवी अस्तित्वच इथल्या वर्णव्यवस्थेने नाकारले होते अशा बहुजनातील सदसदविवेकबुद्धी जागवून निःपक्षपातीपणे संशोधन करणारे इतिहास संशोधक, अभ्यासक आदींनी परिश्रमपूर्वक शोध लेखन करुन पुरावे आणि. दाखले देत खरा इतिहास जगापुढे उघड केल्यामुळे निद्रिस्त अवस्थेत असलेला बराचसा अज्ञानी बहुजन समाज आणि ऍडव्होकेट गाझीयोद्दीन शाह यांनी अतिशय परिश्रम घेऊन क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि बाबासाहेब डॉ भीमराव आंबेडकर या महान विभूतींच्या जीवन कार्यावर स्वतंत्रपणे सखोल अभ्यास करून प्रत्येकाचा ‘हयात और कारनामे’ असे ग्रंथ रुपी शोध लेखन केल्यामुळे आज मुस्लिम समाजही जागृत होऊन त्या सर्वांनाच आपले शत्रू कोण आणि मित्र कोण याची सत्यता पटायला लागली आहे.

या सर्वांना खरे-गोटे,योग्य-अयोग्य, न्याय-अन्याय याची जाणीव होऊ लागली आहे.महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावरून. वाटचाल करीत असताना सत्य उलगडत असल्याने ब्रम्हाच्या मुखातून जन्म झाला असल्याने ब्रम्हांडातील सर्व ज्ञान त्यांना अवगत असते . देव मंत्रांच्या अधिन असतात,मंत्र भट पंडितांच्या अधिन असतात म्हणजेच अप्रत्यक्षरीत्या देव भट पंडितांच्या अधिन असतात या भाकड कथेवर आस्था ठेवण्याच्या बहुजनांतील काही मूर्खांच्या अज्ञानावर उभा असलेला मनुवादी ज्ञानाचा डोलारा आता वेगाने ढासळू लागला आहे. त्यामुळे मनुच्या पिलावळींना त्या महापुरुषांच्या विषयी प्रचंड चीड असणे स्वाभाविक आहे. पिढ्यानपिढ्या त्यांच्या पूर्वजांनी केलेला अन्याय उघड होऊ नये आणि आता आपण वेगवेगळे क्लुप्त्या वापरुन पुन्हा मनुची व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी जे षडयंत्र करत आहोत ते जनतेला उमगु नये. यामुळे कुठे आपल्या अस्तित्वालाच आता धक्का पोहोचतो की काय या विचाराने आता भाजपमधील काही भिकारी भयग्रस्त होऊन भलतीच बडबड करत आहेत.

वास्तविक आपले अस्तित्व धोक्यात येत असल्याची जाणीव होण्याबरोबरच केंद्र आणि अनेक राज्यात सत्तेवर असलेल्या त्यांच्या सरकारने केवळ सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने जनतेला दिलेली भरमसाठ आश्वासनं पूर्ती करण्यात आलेले अपयश,वाढती बेरोजगारी,फसलेली अर्थव्यवस्था ,घसरलेले शैक्षणिक धोरण आणि विशेष म्हणजे महाराष्ट्रातून गुजरातला पळवून नेलेले शेकडो कोटींचे प्रकल्प वाचविण्यात आलेले अपयश आदी सर्वच आघाड्यांवर तोंडघशी पडल्यानंतर बेरोजगारी व महागाईचे वाढते डोंगर आदी अनेक गोष्टींपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी नित्य नियमाने बहुजन महापुरूषांविषयी उलट सुलट आणि बदनामीकारक वक्तव्यं करून समाजमन कलुषित करण्याचा खेळ त्यांच्याकडून
खेळला जात आहे.

लोकशाही प्रणालीत संख्येच्या बळावर आपण सत्तेवर येणे कधीच शक्य नाही हे ओळखून असत्य, अनैतिक मार्गाची वाट तुडवत अतिशय काबाडकष्ट (?)करुन अर्ध्या चड्डी वरुन पॅन्ट मध्ये यायला म्हणजेच सत्ता हस्तगत करायला त्यांना तब्बल ९० वर्षे लागली आहेत. त्यासाठी ४५ रु लिटर पेट्रोल व ४५० रुपयाचा गॅस मध्ये गुदमरत असल्याचा कांगावा करण्याचे कंत्राट देऊन किसनराव आणि त्यांच्या अनेक इच्छाधारींना सोबत घेऊन दिल्लीत रामलीला रंगविण्यात ही ते मागे हटले नाहीत.

इतिहासाची मोडतोड करुन इतिहास विकृत करण्याबरोबरच बहुजन महापुरुषांची बदनामी/अवमान करण्याची संघाची फार जुनी प्रथा आहे.या लोकांनी आजपर्यंत देशात सातत्याने धर्मा-धर्मात, जाती-जातीत विषारी फुत्कार सोडण्याची परंपरा कायम राखली आहे.हे लोक माणसा माणसात भेद आणि द्वेष पसरविण्या इतके विषारी कसे आहेत याचे उत्तर त्यांच्या डीएनए मध्येच सापडते. जयपूरमधील विशेष एनआयए कोर्टाने मार्च २०१७ मध्ये दिलेल्या एका निकालानुसार सुनील जोशी, देवेंद्र गुप्ता, भावेश पटेल या संघाशी संबंधित तीन आतंकवाद्यांना दोषी ठरविल्यामुळे आजीवन कारावासाची शिक्षा झालेली आहे.हेच त्यांची मानसिकता आणि कार्यपद्धती दाखविणारा स्वच्छ आरसा मानला पाहिजे.ते स्वतः तर विष ओकतातच. परंतु केशवराव जेधे म्हणतात त्याप्रमाणे बहुजनातील ज्यांच्या धडावर त्यांचे स्वतःचे डोके आणि त्यात मेंदू नाही आणि जे त्यांनी निर्माण केलेल्या स्वर्ग-नरक, देव-दानव, अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरांच्या गर्तेत स्वतःला अडकवून घेऊन आभासी स्वर्ग गाठण्याच्या आशेवर जगतात अशा लोकांचा वापर ही बहुजन महापुरूषांचा अपमान करण्यासाठी संघाकडून केला जातो.

संघाच्या पिलावळींनी नेहमीच बहुजन महापुरूषांना बदनाम/अवमान करण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यात शिवशाहीरीचे बुरखाधारी बळवंत.मो.पुरंदरे, साळगांवकर, भांडारकर कृष्णा भास्कर कुलकर्णी नंतर पुन्हा एकदा विशिष्ट जात समुह स्पष्ट करणारे कुलकर्णी हे नाव लपविण्यासाठी मनोहर कुलकर्णी हे नाव बदलून बहुजनांशी जवळीक साधण्यासाठी संभाजी भिडे हे नाव धारण करणारे धारकरी हे नाव सर्वांना परिचित आहे.

अगदी अलिकडील म्हणजे भाजपाचे राज्यपाल आणि ‘भगतसिंग’ या नावाला कलंक असणारे विशेषतः अत्यंत विषारी विचारांचे कोश्यारी यांनी बहुजन महापुरुषांच्या बदनामीची उघडलेली मोहीम अजून सुरुच आहे.त्यांच्या विषारी ओकारीच्या संसर्गामुळे कोश्यारी यांच्यानंतर मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि आता चंपा पाटील.अशी संघ आणि त्यांच्या मुशीत तयार झालेल्या त्यांच्या पिलावळींमध्ये बहुजन महापुरुषांचा अवमान करण्याची जणू साथच पसरलेली दिसते आहे.

त्यातच आज महाराष्ट्राचे राजकारण अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत असून शिवसेना खरी कुणाची या न्यायालयाच्या निर्णयावर या सरकारचे भवितव्य अवलंबून असल्याकारणाने अख्खं सरकार तर चिंतेत आहेच परंतु त्याहून अधिक स्वतः तत्वनिष्ठ प्रामाणिक असल्याचा आव आणणारे,सत्तेला चटावलेले काही जण सत्ता गेली की आपण उघड्यावर येऊ म्हणून अक्षरशः बिथरलेले आहेत.

जग विज्ञानाच्या जोरावर एकीकडे अतिशय वेगाने नवनवीन शोध आणि तंत्रज्ञान विकसित करत असताना इथे भारतात मात्र शेण आणि गोमूत्राची महती सांगणारे, विज्ञानाने ग्रह-तारे,चंद्र-सूर्य आदींची सखोल माहिती उपलब्ध करुन देवून ही शनीची साडेसाती,ग्रह-तारेंमुळे संकट ओढवते आणि त्याचा तंत्र-मंत्र उपायाने बंदोबस्त करता येते असा संदेश देणारे जाहिरातींना बंदी न घालता उलट असे कार्यक्रम प्रसारीत आणि प्रसिद्धीसाठी प्रसार माध्यमांना परवानगी देणारे मंत्री आणि सगळ्यात कहर म्हणजे भावी पिढी घडविण्यासाठी धोरण ठरविणा-या शिक्षणासारखे महत्वाचे खाते सांभाळणारे चंपा सारख्या मंत्र्याला जर ‘लोकवर्गणी’ आणि ‘भीक’ यातील फरकच कळत नसेल तर या देशाच्या भवितव्याविषयी सज्जनांना चिंता वाटणे स्वाभाविक आहे. स्वतःचा हक्काचा मतदार संघ तयार करता न आल्याने पक्ष श्रेष्ठिंकडे अन्य जिल्ह्यांतील मतदार संघाची भीक मागणरे हे चंपा आणि सारवासारव करत त्यांचे समर्थन करणा-या त्यांच्या बगल बच्च्यांना काय कळणार आहे आमच्या पूर्वजांनी शाळा कशा, कोणत्या परिस्थितीत आणि कुणासाठी चालू केल्या.? यांना तर फक्त तयार असलेल्या आयत्या आणि सुस्थितीत सुरू असलेल्या उद्योग आणि शैक्षणिक संस्था बंद करण्याच्या आणि मग त्या निवडक उद्योगपतींना
विकायच्या एवढीच कला अवगत आहे.विशेष म्हणजे हिंदुत्वाचा ठेका घेणारेच आज एकेक शाळा बंद करत सुटले आहेत. ग्रामिण भागातील शाळा बंद केल्या तर कुणा बापट, नाडकर्णी भावेंची मुले अशिक्षित राहणार नाहीत.कारण इकडे सर्व सामान्यांना मराठीचा डोस पाजत अभिजात मराठीचा नगारा वाजवण्याचा गोंगाट सुरू करून तिकडे निखिल,नवीन. तन्मय शिस्तबद्ध आणि शांतपणे इंग्रजीचे धडे गिरवत असतात.आणि हे कुणाला कळू नये म्हणून जाणीवपूर्वक
बहुजन महापुरुषांबद्दल अवमानकारक अशी बेताल वक्तव्य करुन महाराष्ट्रातील वातावरण गढूळ केलं जातं आहे. त्यामुळे बहुजनांनी हा कावा वेळीच ओळखला पाहिजे.

मुळात भीक मागण्याच्या परंपरेत वाढलेले/ तयार झालेले आणि अख्खा देश धर्म,जाती,लिंगभेद न मानता आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वातंत्र्यासाठी जिवाची बाजी लावून ब्रिटीशां विरुद्ध लढत असताना स्वतःला स्वयंसेवक, धर्माभिमानी म्हणून घेणारे मात्र त्याच ब्रिटीश राजवटीसमोर अनेकवेळा क्षमा आणि दयेची भीक मागून वातंत्र्य चळवळीपासून स्वतःला अलिप्त ठेवून ब्रिटीशांची गुलामी/नोकरी/करण्यात धन्यता मानून त्या माध्यमातून कागदोपत्री फेरफार करत शेकडो एकर सरकारी जमिनींची भीक बक्षीसीच्या नावाखाली बळकावल्या आहेत.याचे कागदोपत्री ढळढळीत पुरावे उपलब्ध असतानाही अशा कर्तृत्ववान (?) माफीविरांचे खुले उदात्तीकरण केले जाते आणि उलट स्वाभिमानी,नीती मान बहुजन महापुरुषांना भिकारी म्हटले जात आहे. असे म्हणायचे धाडस चंपा सारखे पुढारी करतात याचे एकमेव कारण म्हणजे ‘अस्तिन के सांप’ म्हटले पाहिजे. बहुजनांकडून याला संघटीत.होऊन म्हणावे तसे प्रखरपणे विरोध केला जात नाही.आणि म्हणून दिवसेंदिवस या मनुवाद्यांची हिंमत वाढत चालली आहे. आशा लोकांचा बहुजन महापुरूषांची बदनामी करण्याचा मुख्य हेतू म्हणजे त्यांचा खराखुरा महान इतिहास, महान किर्ती समाजासमोर येऊ नये हाच आहे.त्यांचे विचार संपवता येत नसतील तर निदान त्यांच्या चारित्र्याची हत्या करून त्यांच्याविषयी समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे हाच कुटिल डाव आहे .

चंपा हे भीक आणि भिकारी कशाला म्हणतात याची नवी व्याख्या तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत.एक तर त्यांचा अभ्यास कच्चा आहे अथवा शिक्षणमंत्री या पदासाठी ते लायक नाहीत हे स्वतः हून सिद्ध करून देत आहेत.

आज केंद्रात आणि अनेक राज्यात वर सांगितल्याप्रमाणे सरकारच्या निष्क्रिय आणि चुकीच्या धोरणांमुळे उद्भवलेल्या जीवनावश्यक समस्या, सर्व आघाड्यांवर आलेले अपयश आदी अनेक गोष्टींपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी सरकारच्या समर्थनार्थ संघात उच्च, जबाबदार आणि महत्वाच्या पदावर विराजमान नेते मंडळीच बहुजन महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करत आहेत, असतात. प्रकरण अंगलट यायला लागले की,.विरोधकांवर खापर फोडत या प्रकरणी विरोधक राजकारण करत आहेत,आपल्या वक्तव्याचा विपरीत अर्थ काढला जात आहे,आपल्या म्हणणाचा तो अर्थ नव्हता, दिलगिरी व्यक्त करतो..असे गुळमुळीत स्पष्टीकरण देत सारवा-सारव करण्याचा प्रयत्न करतात यालाच ग्रामीण भाषेत ‘पाद गेल्यावर xx आवळायला प्रयत्न करणे’ असे म्हणतात. ते एकदा ओकलेली घाण परत चाटायचा प्रयत्न करतात. अशा वेळी या बोलघेवडे वाचाळवीरांचे आश्रयदाते कर्ते करविते त्यांच्या बचावासाठी सदैव तत्पर असतात हे पक्कं माहीत असल्यामुळेच हल्ली महाराष्ट्रात हे सतत घडत आहे.सत्तेचा माज चढल्याने सरकार पक्ष आणि सरकारात जबाबदारीच्या पदावर असूनही संघातील वेठबिगारांमध्ये बेताल वक्तव्य करण्याची जणू चढाओढच लागलेली आहे.

अशा सत्तांध आणि मुजोर प्रवृत्तीच्या फुटकळ पुढा-यांना लोकांच्या विरोधाची मुळीच पर्वा नाही. कारण त्यांनी निर्माण केलेल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात जनतेची स्मरणशक्ती अल्पकालीन असते हे त्यांना ठाऊक आहे. तसेच बहुजनांतील काही मूठभर स्वाभिमान शून्य ,स्वार्थी लोकांकडून आपण काहीही केलो तरी कुठलाच विरोध होणार नाही याची त्यांना पूर्ण जाणीव असल्यामुळेच ते संख्येने साडेतीन टक्के असून एका गावचा सरपंच निवडून आणायची क्षमता आणि धमक नसतानाही ते हर त-हेचे षडयंत्र करून आजवर देश आणि देशातील जनतेवर अमर्याद सत्ता गाजवत आहेत. याला
वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.

बहुजनांना आपल्या हिताचे रक्षण करणारे सरकार निवडायचा हक्क भारतीय संविधानाने दिला असतानाही नेमकं आपण वर्षानुवर्षे कुणाला उरावर घेऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत हे देखील बहुजनांना समजणे अत्यंत गरजेचे आहे.’म्हातारीला मरू द्या चालेल. काळ सोकावतो आहे म्हणून त्याला समस्त बहुजनांनी ताकद लावून संपवायला हवे.

एकदा का बहुजन सर्व शक्ती एकवटून जागृत होऊन जाब विचारायला लागला तर क्षणार्धात मनुवाद पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल यात शंका नाही.इतकेच.✍🏻

✒️विठ्ठलराव वठारे(अध्यक्ष,जन लेखक संघ,महाराष्ट्र)
joshaba1001@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here