Home मनोरंजन ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखाने कुलूप बंद का? अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी घेतला आसरा

ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखाने कुलूप बंद का? अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तालुक्याच्या ठिकाणी घेतला आसरा

171

✒️विशेष प्रतिनिधी(उपक्षम रामटेके)

चिमुर(दि.15डिसेंबर): -आपला देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशातील 80 टक्के जनता ही शेती करते,जी जनता शेती करते ती जनता बहुतांश ग्रामीण भागात राहते, शेती म्हटले की पशु आलेच. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून काही लोक पशुपालन करतात. पशुच्या आरोग्यविषयक समस्याचे निराकरण करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी मुख्य पशु वैद्यकीय दवाखाना तर ग्रामीण भागात अनेक उपकेंद्र असतात. या उपकेंद्रामध्ये कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कॉटरची व्यवस्था असते परंतु कर्मचारी तिथे न राहता तालुक्याच्या ठिकाणी राहतात. त्याची झळ ग्रामीण भागातील जनतेला बसत आहे.

उदाहरण द्यायचे झाले तर,दिनांक 14 रोज बुधवार ला कोटगाव येथील रहिवासी असलेल्या अनुसया भोस्कर यांच्या बोकडाला साप चावला, त्याला उपचारासाठी जांभूळघाट येते नेण्यात आले परंतु तिथे कोणतेच कर्मचारी उपस्थित नव्हते, योग्य उपचार न झाल्याने त्या बोकडाचा आज (15 डिसेंबर) सकाळी मृत्यू झाला तर काही महिन्या अगोदर वामन रामटेके यांचा बैल सुद्धा उपचार न झाल्याने मृत्यू पावला असे अनेक प्रसंगाची प्रचिती ग्रामीण भागातील जनतेला येते आहे. योग्य वेळी उपचार न झाल्याने जनावरांचा होणारा मृत्यू हे शेतकऱ्यांची कधी न भरून निघणारी आर्थिक आहे. कर्मचारी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी राहतात. तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन कारण आपल्या मुलाला योग्य शिक्षण दिले पाहिजे.

परंतु गरीबाच्या पशुचे काय…? शेतकरी आपल्या पशूला आपल्या मुलाप्रमाणे जपतो ना… मग त्याचं काय? उपकेंद्रामध्ये कॉटरची सुविधा असून जे कर्मचारी कॉटर मध्ये राहत नसतील अशांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी जनता करीत आहे. याबाबत राज्य सरकारने आदेश जारी करून कर्मचाऱ्यांना उपकेंद्राच्या गावी राहणे बंधनकारक करावे. ज्या पद्धतीने कर्मचारी आदर्श व जबाबदार पिता होण्यासाठी धावपळ करतात त्याच पद्धतीने योग्य व चांगला पशु कर्मचारी होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here