🔸गेवराई ते तलवाडा डांबरी रस्त्यावर त्वरिता देवी बस थांबा ते एक मिनार मस्जिद वळणावर आत्तापर्यंत घडले नऊ आपघात पैकी चौघाचा मृत्यु तर पाच व्यक्तिंना आले कायमचे अपंगत्व!
===========
✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)
गेवराई(दि.14डिसेंबर):-तालुक्यातील तलवाडा येथे छत्रपति शिवाजी महाराज चौका लगट हाकेच्या अंतरावर पावन दत्त मंदिर संस्थान (मंदिर) असुन या दत्त मंदिरा पासुन ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक तलवाडा जुने बस स्थानक पर्यंच्या डांबरी रस्त्याची आवस्था खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे आशी झाली असुन दुचाकीवरुन रहदारी करना-या आणेक सवारांना या ठिकाणी वाहने स्लिप होऊन दुखापत झालेल्या असुन दत्त मंदिर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंतंचा खराब झालेला डांबरी रस्ता तात्काळ करण्यात यावा.
तसेच गेवराई ते तलवाडा डांबरी रस्ता एक मिनार मस्जिद गोलाई वळणावर आपघाताची मालिका लक्षात घेऊन या ठिकाणी गतिरोधक बसवावे आशी मागणी तलवाडा ग्रामपंचायतचे ऊप सरपंच. व राष्ट्रवादी कांग्रेस अल्पसंख्याक सेवादल गेवराई तालुकाध्यक्ष आक्रम सौदागर (अज्जुभैय्या) यांनी निवेदनाच्या माध्यमातून मा. मुख्य कार्यकारी अभियंता सा. बा. वि. बीड यांच्या कडे केली आहे. या बाबत अधिक माहिती आशी की गेल्या आणेक वर्षा पासुन पावन दत्त मंदिर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक जुने बस स्थानक तलवाडा पर्यंतच्या डांबरी रस्त्याची आवस्था पहाता तो डांबरी रस्ता तात्काळ करण्यात यावा या ठिकाणी दुचाकी स्लिप होऊन आणेकांना दुखापत झालेल्या आहेत.
ह्या गंभीर बाबींची सा.बा.वी.बीड दखल घ्यावी. तसेच गेवराई ते तलवाडा डांबरी रस्ता एक मिनार मस्जिद गोलाई वळणावर गतिरोधक तात्काळ बसवावे! कारण त्वरिता देवी बस थांबा ते एक मिनार मस्जिद गोलाई वळणावर आत्तापर्यंत आणेक आपघात घडलेले आहेत. सबब या मागणीची तात्काळ मुख्य कार्यकारी अभियंता बीड यांनी दखल घेऊन ह्या जिव़घेण्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा आशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून तलवाडा ग्रामपंचायतचे ऊप सरपंच. व राष्ट्रवादी कांग्रेसचे अल्पसंख्याक सेवादल गेवराई तालुकाध्यक्ष आक्रम सौदागर(अज्जुभैय्या) यांनी केली आहे.गेवराई ते तलवाडा येणारा रोड दत्तमंदिर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया पर्यंत डांबरी रस्त्याची दुरावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतक-यांच्या ऊस वाहतुकीस मोठया प्रमाणात अडचण होत आहे. मेन रोड खराब झाल्यामुळे वाहतुकीस आडथळा निर्माण होत आहे.यामुळे जिवीतहानी होण्याची शक्याता नाकारता येत नाही. तसेच गेवराई ते तलवाडा रोड एकमिनार मस्जीद जवळील वाकनावर गतीरोधक बविण्यात यावे याठिकाणी गतीरोधक नसल्यामुळे भरधाव वेगाने येणा-या – जाना-या वाहणाचे अपघात होऊन ब-याच लोकांना जिवास मुकावे लागले.
त्यामुळे तात्काळ ड्रीम कंट्रक्शन या कंपनीला याठिकाणी गतीरोधक बसविण्याचे आदेशीत करण्यात यावे. व दत्तमदिर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळया पर्यंत डांबरी रस्ता करण्यात यावा. नसता.दि.26/12/2022 वार सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक तलवाडा याठिकाणी ठिक सकाळी 11.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सेवादल च्या वतीने आपल्या विरोधात तीव्र स्वरुपात रास्ता रोको अंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. व होणा-या परीनामास संबंधीत विभाग जबाबदार राहील. आसे निवेदनाच्या शेवटी म्हण्टले आहे