Home महाराष्ट्र अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे राबविण्यात येणार्या योजनेबाबतची माहिती देणारी माहितीपुस्तिका प्रकाशित करुन त्याची...

अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे राबविण्यात येणार्या योजनेबाबतची माहिती देणारी माहितीपुस्तिका प्रकाशित करुन त्याची जनजागृती करण्यात यावी – शेख अख्तर हमीद

131

🔹उपविभागीय अधिकारी परळी मार्फत जिल्हाधिकारी,राज्य शासनास निवेदन

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.14डिसेंबर):- १८ डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास मंञालय मार्फत राबवण्यात येणार्या योजने बाबतची माहिती पुस्तिका प्रकाशित करुन त्याची जनजागृती करावी तसेच सर्व तालुक्यातील शासकीय कार्यालय, शासकीय व खाजगी शाळा आणि महाविद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यासाठी परिपञक काढावे अश्या मागणी चे निवेदन गुलशन ए खिजरा सेवा भावी संस्था परळी चे अध्यक्ष शेख अख्तर हमीद व सहकार्यानी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी साहेब बीड यांना दिले आहे.

सविस्तर वृत्त असे की भारतासह जगभरात दरवर्षी १८ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन साजरा केला जातो. 18 डिसेंबर 1992 पासून,संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे, अल्पसंख्याक समुदायांच्या हक्कांचे संरक्षण करणे, राष्ट्र उभारणीत त्यांचे योगदान म्हणून चिन्हांकित करणे, त्यांच्या विशेष क्षेत्रात त्यांची भाषा, जात, धर्म, संस्कृती, परंपरा इत्यादींचे संरक्षण सुनिश्चित करणे. अल्पसंख्याक आणि समाजाचे प्रबोधन करण्यासाठी साजरा केला जातो. कायदेशीरदृष्ट्या, भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्याकांची कोणतीही स्पष्ट व्याख्या नाही, परंतु संविधानातील अनेक तरतुदी जसे की कलम 29, 30 इत्यादी अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी पहिल्या दिवसापासून संविधानात आहेत. भारत सरकारच्या अल्पसंख्याक विभाग मंत्रालयाने शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, बौद्ध आणि जैन समुदायांना अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित केले आहे.

या दिवसाच्या निमित्ताने सर्व जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांमध्ये अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी गट व विद्यार्थी यांच्यासाठी भित्तीपत्र, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करणे,स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देणे याच बरोबर व्याख्यानमाला,चर्चासत्र आणि परिसंवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत असे शासनादेश दरवर्षी परिपञका द्वारे जारी केला जातो.राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी अल्पसख्यांक विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात सदर योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात या हेतूने राज्यातील अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवीत आहे.

राज्य शासनाच्या अल्पसंख्यांक विकास विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या जनहिताच्या विविध योजनाबाबतची माहिती देणारी माहिती पुस्तिका १८ डिसेंबर अल्पसंख्याक हक़्क दिवशी प्रकाशित करुन त्याची समाजात जनजागृती करण्यात यावी सदर माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून तळागाळातील जनतेपर्यंत योजनांची माहिती पोहचून अल्पसंख्यांक समाजातील लोकांची उन्नती होऊन त्यांना प्रवाहात आणण्यास व योजनेचा लाभ गरजूना होण्यासाठी पुस्तिका मुळे मदद होईल.

तसेच काही प्रमुख मागण्या खालील प्रमाणे करत आहोत…..

1) यावर्षीचे अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करणेसाठी किमान 1 लाख रकमेचच्या निधीची मागणी अल्पसंख्याक आयोग व अल्पसंख्याक मंत्रालयाकडे करावी.

2) गेल्या वर्षात अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समितीच्या किती बैठका झाल्या व त्या बैठकीतील इतिवृत्त आम्हास अवगत करावे.

3) अल्पसंख्याक विकास योजनामधुन गत 3 वर्षामध्ये झालेल्या विकास कामांची माहीती सार्वजनिक करावी,

4) या वर्षिचा अल्पसंख्याक हक्क दिवस 18 डिसेंबर हा रविवारी येत असलेने सलगच्या आठवड्यात आपले उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांच्या व अल्पसंख्याक समाजाचे सामाजिक ,राजकिय,शैक्षणिक प्रतिनिधी तसेच सन्माननीय लोकप्रतिनिधींचे समवेत जिल्हास्तरिय अल्पसंख्याक विकास योजना जनजागृती व आढावा बैठक घेण्यात यावी.

5) वक्फ व इनाम जमिनीचे मालकी हक्क सदरामध्ये तसेच या जमिनीची मालकी वैयक्तिक नावे न ठेवता वक्फ संस्था /ट्रस्ट च्या नावे करण्याचे शासकिय आदेश असतानाही अनेक तहसिलदारानी अशी प्रकरणे प्रलंबित ठेवली आहेत.म्हणुन याबाबत ही मा.तहसिलदारांना सुचना/आदेश द्यावेत.

6) बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा,शासकीय महाविद्यालय, शासकीय कार्यालय,खाजगी संस्थेच्या शाळा व महाविद्यालयात अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्यासाठी आपल्या कार्यालय मार्फत परिपञक काढुन सुचना करावी.

अल्पसंख्याक समाज हा मागासलेल्या आहे हे शासनाच्या न्या.सच्चर आयोग व महेमदुर्रहमान समिती ने सिद्ध केल्यानतर केंद्रशासनाने पंतप्रधान 15 कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रम जाहिर केला,आहे.परंतु या समाजासाठी विशेष ठोस पावले उचलली जात नाहीत म्हणुन कृपया आमच्या निवेदनाचा सहानुभुतीने विचार करुन योग्य ती कार्यवाही करावी,जिल्हा अल्पसंख्याक विकास संनियंत्रण समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात तसेच अल्पसंख्याक हक्क दिवसानिमित्त विविध कार्यक्रमाद्वारे प्रभावी अंमलबजावणी करावी व सदर माहिती पुस्तकेचे प्रकाशन करुन जनजागृती करावी अश्या मागणीचे निवेदन गुलशन ए खिजरा सेवा भावी संस्था परळी चे अध्यक्ष अख्तर हमीद यांनी उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी साहेब बीड यांना दिले आहे.

यावेळी निवेदन देताना संस्थेचे सचिव रशीद पठाण, सहसचिव सय्यद नजीर,शेख नमुद हसन,शेख तय्यब भाई,शेख मुक्तार भाई, शेख एजाज भाई,सिराज पठाण,एजाज पठाण, जावेद शेख अध्यक्ष, शेख शारेख,मुजाहेद कुरेशी, सिराज पठाण,जुबेर कुरेशी,इस्माईल पठाण, शेख जमीर भाई,शेख अजहर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here