
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी. पाटील सर)
धरणगाव(दि.9डिसेंबर):– शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे शाळेचे माजी विद्यार्थी अँड रविंद्र गजरे, बाभळे यांनी नुकतीच कायद्याच्या क्षेत्रातील एल.एल.बी.पदवी संपादन केली. याचे औचित्य साधून आमचा विद्यार्थी – आमचा अभिमान असे म्हणत शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, पर्यवेक्षक एम.बी.मोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गजरे यांचा सन्मान करण्यात आला.
माझ्या शाळेने माझा सन्मान केला. ही कौतुकाची थाप माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. यापुढे निश्चितच शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा आदर्श घेऊन समाजोपयोगी कार्य करत राहील व गोरगरीब जनतेला न्याय देईल असे प्रतिपादन अँड रविंद्र गजरे यांनी केले.
याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक एच डी माळी, व्ही टी माळी, ज्येष्ठ लिपिक जे एस महाजन, कनिष्ठ लिपिक पी डी बडगुजर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार पी डी पाटील यांनी मानले.
