Home चंद्रपूर चंद्रपुरात 9 डिसें. ला निरंजन टकले यांचा सत्कार व व्याख्यान कार्यक्रम

चंद्रपुरात 9 डिसें. ला निरंजन टकले यांचा सत्कार व व्याख्यान कार्यक्रम

107

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.9डिसेंबर):- दि वीक चे शोध पत्रकार आणि सोहराबुद्धिन खून खटल्याची सुनावणी करणारे सीबीआय जज श्री ब्रुजमोहन लोयाच्या खुणा मागचे सत्य “जज लोयाचे मारेकरी कोण? हे पुस्तक लिहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ निर्माण करणारे धाडशी शोध पत्रकार श्री निरंजन टकले यांना *लोकशाहीचा योद्धा* पुरस्काराने सन्मानित करण्याचा व त्यांच्या व्याख्यानाचा जाहीर कार्यक्रम महापुरुषांच्या विचाराने कार्यरत सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट च्या वतीने दि 9 डिसेंबर 2022 ला सायं. 5 वा मातोश्री सभागृह तुकूम, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक, विविध स्वयंसेवी संस्थामध्ये कार्य करणारे कार्यकर्ते, वकील मंडळी, विधीचा अभ्यास करणारे विध्यार्थी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, कामगार क्षेत्रात कार्यरत संघटना व कार्यकर्ते, विविध व्यावसायिक, सामाजिक संघटना विध्यार्थी व युवा संघटना, महिला संघटना व नागरिक संघटना, पत्रकार व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट चे मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here