Home महाराष्ट्र शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी मा.संजय दाते यांची नियुक्ती

शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी मा.संजय दाते यांची नियुक्ती

540

✒️मनोहर गोरगल्ले(पुणे,जिल्हा प्रतिनिधी)

राजगुरुनगर(दि.8डिसेंबर):-शिवशंभू छावा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी मा.संजय दाते यांची नियुक्ती करण्यात आली.शिवशंभू छावा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मा.भरतभाऊ पवळे, महाराष्ट्र राज्य सचिव मा.मनोहरजी गोरगल्ले यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी शिवशंभू छावाचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ टाकळकर, पुणे जिल्हा संघटक डाॅ.बाळासाहेब माशेरे(सर) शिरुर लोकसभा कार्याध्यक्ष बाळासाहेब येवले, तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.शिवश्री मा.संजय दाते यांनी अनेक संघटनांनमध्ये खुप चांगले काम केले आहे.तसेच त्याना शिवकार्याची व गड किल्ले संवर्धनाची आवड आहे.

नियुक्तीच्या वेळी त्यांनी सांगितले की मी शिवरायांचा मावळा असुन मी भविष्यात शिवकार्य असु किंवा समाज कार्य सर्वांना बरोबर घेऊन करणार असून शिवशंभू छावा प्रतिष्ठानची गाव तिथे शाखा उद्घाटन करणार असून त्या माध्यमातून असणार्या नागरिकांना व महिला भगिनींना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.तसेच अनेक सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here