सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि. 6 डिसेंबर) येथील सम्यक बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथे भारतीय राज्यघटने शिल्पकार, महामानव बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य कँडल मार्च अभिवादन रॅली काढून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
आज पंचशिल ध्वजाचे अर्धवट ध्वजारोहण भदंत कीर्ती बोधी व भारताबाई दिवेकर यांनी केल्या नंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
तर सायंकाळी 7 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधून भव्य कॅन्डल मार्च रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
सदर कॅन्डल मार्च रॅली अतिशय शांततेत पार पडली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलीस प्रशासनाच्या वतीने ठाणेदार अमोल माळवे साहेब, सुजाता बनसोड मॅडम दीपक कांबळे साहेब व बंदोबस्त असलेले अनेक पोलीस बांधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पर आपण करून अभिनंदन केले.
यावेळी असंख्य धम्म बांधव, भगिनी, तरुण मंडळी व बालक बालिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य कॅन्डल मार्च रॅलीचे आयोजन प्रफुल दिवेकर (युवा सामाजिक कार्यकर्ते), सिद्धार्थ दिवेकर (शहराध्यक्ष भिम टायगर सेना) कुमार केंद्रेकर (अध्यक्ष शांतीदुत समिती) रमामाता महिला मंडळ, भिम टायगर सेना (सामाजिक संघटना) यांनी केले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ दिवेकर (युवा पत्रकार) यांनी केले तर आभार प्रफुल दिवेकर यांनी मानले.




