
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.7 डिसेंबर):-ने.हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे आधुनिक भारताचे निर्माते ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 66 व्या महापरिनिर्वाण दिनाला आयोजित अभिवादन कार्यक्रम उपप्राचार्य मा. के.एम.नाईक सर यांचे अध्यक्षतेखाली तथा मा. प्रा.पी.आर.जिभकाटे सर,मा. राजेंद्रजी हेमके साहेब, मा. व्ही.एस.बगमारे सर, मा. एस.एस.भैसारे सर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विद्यालयात आयोजित वक्तृत्व स्पर्धा व गीत-गायन स्पर्धेत अनेक विद्यार्थांनी सहभाग घेतला. मा. प्रा.डॉ. पी.एन.बेंदेवार सर तथा मा. एस.एस.भैसारे सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्यावर प्रकाश टाकला. मा. एन.एस.बोरकर सर यांनी याप्रसंगी अर्थपूर्ण गीत सादर केले.
मा. के.एम.नाईक सर यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय विद्यार्थी जीवन ते भारतीय राज्यघटनेचे निर्माते असा जीवन प्रवास सांगताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात महापुरुषांचे विचार व कार्य सदा ज्ञात ठेवून आदर्श नागरिक बनावे असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.निकिता कडूकार व आभार प्रदर्शन रोहित धोटे याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद, विद्यार्थी प्रतिनिधी यांचे सहकार्य मिळाले.
