Home महाराष्ट्र प्रबुद्ध विध्याभवन मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भावपूर्ण वातावरणात संपन्न

प्रबुद्ध विध्याभवन मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भावपूर्ण वातावरणात संपन्न

204

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी, म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड (दि.६ डिंसेबर ):-येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या प्रबुद्ध विद्याभवनमध्ये “ डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन “ अत्यंत भावपुर्ण वातावरणात झाला.यावेळी मुधोजी काॅलेजचे प्रा.अक्षय अहिवळे म्हणाले, “ प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रूजविण्यासाठी, वाढविण्यासाठी प्रबुद्ध चा सगळा शिक्षकवर्ग झटत असतो. टाकीचे घाव घेतल्या शिवाय दगडातून सुंदर मुर्ती आकारास येत नाही. आज मी आपल्या शाळेतील शिल्पकार शिक्षकांमुळे घडलो. सर्व विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून शिका व संस्कारीत व्हा.

सह दुय्यम निबंधक ,वर्ग २- अधिकारी सुहास अहिवळे विचार व्यक्त करताना म्हणाले, “ जेवढी तुम्हाला खेळण्याची आवड आहे तेवढीच आवढ अभ्यासाची निर्माण करा. शिक्षण वाघिणीचे दुध आहे. तो प्राशन करेल तो डरकाळी फोडल्या शिवाय राहणार नाही म्हणून भरपूर खेळा, भरपूर अभ्यास करा. यामुळे मोठे झाल्यावर अधिकारी व्हाल.

यावेळी प्रा. सौरभ अहिवळे अहिवळे म्हणाले,” अनेक मुलांनी खूप सुंदर भिम संदेश सांगितले. काहींनी खूप छान बाबासाहेबां बद्दल भाषणे केली. त्यातील काही विचार आज तुम्हाला कळणार नाहीत. पण हे संस्कार रूजणार आहेत.

कार्यक्रमासाठी जयकुमार रणदिवे, उमेश कांबळे, संदीप अहिवळे उपस्थित होते.यावेळी प्रा.अहिवळे यांनी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य भेट दिले.

कार्यक्रमा नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांची “ भिमअभिवादन फेरी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौका “ पर्यंत काढण्यात आली.
चौकातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे, सागर सोरटे, संदीप काकडे, जयंती मंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिकेत अहिवळे, संजय गायकवाड उपस्थित होते.

प्रबुद्ध मध्ये कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत संस्थाध्यक्ष सिद्धार्थ प्रबुद्ध यांनी केले तर आभार सचिव मिलिंद अहिवळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक कारंडे व व्यवस्था महादेव गुंजवटे, वनिता कांबळे/मोरे व जयश्री होनराव यांनी केली

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कृती अंगीकृत करणारा भारत घडवूया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here