Home चंद्रपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनीच भारत देशात क्रांती होऊ शकते —- डी....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनीच भारत देशात क्रांती होऊ शकते —- डी. के. आरीकर

79

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

 चंद्रपूर(दि.6डिसेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशातील दलित, शोषित, पीडित व मागास वर्गीय समाजाला त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी जीवाचे रान केले. रक्ताचे पाणी केले आणि सर्व सामान्य नागरिकांना मूलभूत हक्काबरोबर मतदानाचा अधीकार मिळवून दिला आणि शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मंत्र दिला त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनीच या देशात क्रांती होऊ शकते, असे विचार जेष्ठ पत्रकार, दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के. आरीकर यांनी व्यक्त केले.

ते सामाजिक न्याय विभागानी आयोजित केलेल्या दि.26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर पर्यंत आयोजित समता पर्व साप्ताह निमित्त सामाजिक कार्यकर्ते व कर्मचारी यांच्या करिता आयोजित केलेल्या कार्यशाळेत कार्यक्रमच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना व्यक्त केले.

यावेळी विशेष अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त मा. व्ही. डी. मेश्राम, विजय मोगरे, सांबा वाघमारे, प्रा. व प्रसिद्ध साहित्यिक ईसादास भडके, तर प्रमुख अतिथी म्हणून जांभुळकर, किसन झाडें, राजू येले व मा दामले साहेब यांची उपस्थिती होती.

पुढे डी. के. आरीकर म्हणाले बाबासाहेब यांनी एस सी, एस टी बरोबर ओबीसीना घटनेत 340 कालमानुसार आरक्सनाची संधी उपलब्ध करून दिली आणि म्हणून ओबीसीनी बाबासाहेब यांचे उपकार विसरू नये. असेही म्हणाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून बोलतांना व्ही. डी. मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह करून महिलांसाठी राज्य घटनेत हिंदू कोडबील आणून महिलांना हक्क व अधिकार मिळवून दिल्याची आठवण करून दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मा. मनोज माकोडे यांनी तर आभार ठाकरे मॅडम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here