Home चंद्रपूर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावरून निर्णय घ्यावे

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावरून निर्णय घ्यावे

258

🔸पुरोगामी शिक्षक संघटनेचे पालकमंत्र्यांना निवेदन

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.5डिसेंबर):- प्राथमिक शिक्षकांच्या अनेक समस्या घेऊन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने चंद्रपूर जिल्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक व वने मंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन दिले .

पालकमंत्री यांना दिलेल्या निवेदनात उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदोन्नतीच्या निकषाबाबत निर्णय घेणे , सर्व विषयशिक्षकांना सरसकट पदवीधरची वेतनश्रेणी लागू करणे , २०२२-२३ च्या बदल्यांकरिता ३०जून२०२२ ही संदर्भ तारीख घेण्यात यावी ,CMP अंतर्गत वेतन व अशासकीय कपात ZPFMS नुसार करण्यात यावी.

केंद्रप्रमुख पदाच्या विभागीय परीक्षेत कमाल वयोमर्यादेची अट निश्चितीबाबत ,पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीसचे मानधन ५०००रुपये करण्यात यावे , नक्षल /आदिवासी क्षेत्रात कार्यरत असेपर्यंत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ देण्यात यावा , शालेय बालक्रीडा स्पर्धा राज्यस्तरापर्यंत घेण्यात याव्या . अशा अनेक मागण्यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली असून , सदर समस्या निकाली काढण्यासाठी शासनस्तवर निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली .

पालकमंत्र्यांच्या या भेटीत संघटनेचे जिवन भोयर, पुरुषोत्तम टोंगे, भोजराज लाटकर, शंकर सुरपाम, प्रदीप मडावी, रविंद्र सेडमाके , किशोर आनंदवार , संजय चिडे ,सुनील कोहपरे , गंगाधर बोढे , सुनीता इटनकर ,सुरेश गिलोरकर , विजय भोगेकर , हरीश ससनकर , अल्का ठाकरे , विद्या खटी , पौर्णिमा मेहरकुरे , सिंधू गोवर्धन , लता मडावी , रवी सोयाम , नरेश बोरीकर , दुष्यांत मत्ते , दीपक वऱ्हेकर , नारायण कांबळे , ज्ञानदेवी वानखेडे , मोरेश्वर बोंडे , सुधाकर कन्नाके , लोमेश येलमुले , राजू चौधरी ,विलास मोरे , पूनम सोरते , सुलक्षणा क्षीरसागर, विलास मोरे ,मनोज बेले ,श्रावण गुंडेट्टीवार आदी उपस्थित असल्याचे प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here