Home Education परसोडी (जाणी) येथे हॉप पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

परसोडी (जाणी) येथे हॉप पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

165

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.4डिसेंबर):- तालुक्यातील परसोडी (जाणी) येथे अमर क्रिकेट क्लब यांच्या पुढाकाराने हॉप पिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे दिनांक 4 नोव्हेंबर 2022 ला रघुनाथ लांडेकर यांच्या भव्य पंटागणात आयोजन करण्यात आले.सदर स्पर्धा उध्दघाटक म्हणून योगिता आमले तर प्रमुख पाहुणे म्हणून सुखदेव प्रधान सर, प्रभाकर रामटेके सर, पराग बनपुरकर, सुधीर पंदीलवार, म्हणून मान्यवर उपस्थित होते.

उध्दघाटक प्रसंगी बोलताना सौ. योगिता आमले यांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन अगोदर विदेशात होत होते पण आता आपल्या देशातील खेडाळु तयार होत आहे.

आपल्या गावातील सुध्दा तरूण पुढे आपल्या इंडिया टीम दिसावे अशी अपेक्षा खेळाडू कडून केली. तसेच सुखदेव प्रधान सर यांनी आपल्या मार्गदर्शनात खेळातून खेळाडू तयार होतात. अभ्यास प्रमाने विद्यार्थ्यांनी खेळाकडे पण लक्ष देण्याची गरज आहे. असे मत व्यक्त केले.

अमर क्रिकेट क्लब यांच्या कडून प्रथम येणाऱ्या संघासाठी 16001 रुपयांचे पारितोषिक तर व्दितीय पारितोषिक 11001 रुपये व तृतीय पारितोषिक 7001 रुपये ठेवण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाला संजय दमके सर संरपच निता शेन्डे, उपसरपंच कैलास खरकाटे, सागर साहारे, गजानन लांडेकर, गणेश लांडेकर, मंगेश शेन्डे, दुर्योधन कार, जितु मंडपे, श्रीराम कार, मधुकर लांडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिन कसा पाळावा ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here