Home चंद्रपूर माजी आमदार संजय धोटे यांचा हिरापुर ताडी येते शेतकऱ्यांसोबत संवाद

माजी आमदार संजय धोटे यांचा हिरापुर ताडी येते शेतकऱ्यांसोबत संवाद

191

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.3डिसेंबर):-लोकनेत्यांना क्षेत्रातिल जनतेशी संलग्नित राहण्याचा मोह जड़ला असतो. नानाविध जनसेवेच्या माध्यमातून जनसेवा अंगी बाणविण्यासाठी ते उत्सुक असतात.

राजुरा क्षेत्रातिल माजी आमदार संजय धोटे यांना हा मोह जडल्याचा दिसुन आला.माणिकगड पहाडावर वसलेल्या हिरापुर ताडी गावात शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संजय धोटे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी आमदार यांचेकडे शेतकरी बांधवांनी त्यांना उद्भवत् असलेल्या समस्यांचा पाढा वाचला.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी लाभ काही शेतकऱ्यांना सुरूवातिच्या काळात मिळाला, परंतु मध्यंतरी हा सन्मान निधी शेतकऱ्यांना मिळेनासा झाला. ही बाब संजय धोटे यांच्या कानी पडताच त्यांनी याबाबत वरिष्ठ अधिकारी वर्गाची कान उजळणी करून कार्यवाही केली. यावेळी इतरही समस्यांचे निराकरण त्यांचेकडून झाले.

यावेळी भाजपा जेष्ठ नेते सुरेश केंद्रे, बालाजी भुते, संजय पवार, अनुलोम चे सतिश मुसळे, स्थान मित्र सुहास सेलघर, अनील दुबे, तिरूपती केजगिर, सिध्दु सलघर, दुदम बाजगिर, गायकवाड भाऊ, सखाराम सपुरे, सुभाष सलघर, दत्ता प़ोळे यांचे सह गावातील शेतकरी बांधव तरूण मंडळी मातृशक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा……!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here