Home महाराष्ट्र पिंप्री खु. आदर्श प्राथमिक शाळेत बालसभा उत्साहात संपन्न

पिंप्री खु. आदर्श प्राथमिक शाळेत बालसभा उत्साहात संपन्न

107

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.29नोव्हेंबर):- पिंप्री खुर्द येथील आदर्श प्राथमिक शाळेत २६ नोव्हेंबर संविधान दिवस व २८ नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले स्मृतिदिनानिमित्ताने बालसभा संपन्न झाली.या वेळी इयत्ता सहावी च्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन केले होते. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आदर्श प्राथमिक शाळेच्या प्रांगणावर बालसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता सहावी ची विद्यार्थ्यांनी कु. माधुरी महेश पाटील ही होती तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थी, अल्तामश खाटीक, कुणाल पाटील, केतकी तायडे आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांचे पूजन केले. तसेच मनोगत व्यक्त करताना महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक नाते व्यक्त केले. शिक्षणद्वार खुले झाल्यानंतर महिलांना मिळालेली संधी , महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्यागाबद्दल माहिती सांगताना विद्यार्थ्यांनी संविधान मध्ये आपले हक्क अधिकार यांची माहिती मिळवत प्रस्तुत केली.

बालसभेचे मार्गदर्शन विषय शिक्षक सचिन पवार यांनी केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रम स्वतः आयोजन केल्या मुळे नवीन बाबींना व शिक्षण प्रवासात अनुभव मिळावा म्हणून पालकांनी कौतुक व्यक्त केले. या वेळी आदर्श प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली चौधरी , उपशिक्षक आर.आर.पावरा, एस.के.शिंदे , आर.एस. पाटील , विलास पाटील ,शरीफ पटेल , रोहित राजपूत आदी उपस्थित होते .बालसभेचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मानसी टिकाराम पाटील हिने केले तर आभार केतकी तायडे हिने मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here