Home चंद्रपूर जातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन....

जातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे

126

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.28नोव्हेंबर):-संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मान. अपेक्षा पिंपळे ह्या होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अॅड. वैशाली टोंगे आणि प्रा. योगेश दूधपचारे हे होते. आपल्या भाषणात प्रा. दुधपचारे यांनी संविधान सर्व भारतीय लोकांचे, भारतीय लोकांसाठी आहे आणि म्हणुन भारतीय लोकांनी संविधानाचे संवर्धन करावे असे प्रतिपादन केले. अॅड. वैशाली टोंगे यांनी ओबीसी समाजानी संविधान समजुन घेण्याची गरज आहे, कारण संविधानाने ओबीसी, एस. टी., एस. सी. आणि इतर मागासवर्गीय समाजाला आरक्षण दिले आहे आणि सर्व भारतीयांसाठी हक्क प्रदान केले आहे म्हणूनच तर ओबीसी समाजाला सन्मानाने जगता येत आहे.

नव्हे तर भारतीय स्त्रीयांना मताचा अधिकार काही न कर्ता संविधानाने दिला आहे. तेंव्हा भारतीय स्त्रियांनी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कधीही विसरु नये असे वक्तव्य केले. संघटनेच्या शहर महासचिव कोमल बोरकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाच्या अध्यक्ष मान. अपेक्षा पिंपळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारत ह्या लोकशाही राष्ट्राला एका धर्मापूरते मर्यादित करु नये ते संविधान विरोधी असेल. कारण भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता स्विकारली आहे. ती कायम रहावी असे सांगून त्या अशाही म्हणाल्या की, भारत जातीमुक्त झाल्याशिवाय भारत जोडो अभियान यशस्वी होणार नाही.

अलीकडे विरोधी पक्ष मुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात काही पक्ष आहेत मात्र विरोधी पक्ष मुक्त भारत केल्याने फार तर लोकशाही नष्ट करता येईल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेच्या जिल्हा महासचिव प्रतिक्षा पाटील तर सुत्र संचालन उपाली अलोने यांनी केले. संविधान सन्मान या राष्ट्रीय समारंभाची सुरवात संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करुन करण्यात आले तर समारंभाचा समारोप राष्ट्रीय गीतांनी करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धिरज रासेकर, प्रशांत रामटेके, संबोधी भडके, रितीक ढवळे, ममता खोब्रागडे, विदीना अलोने, क्विटन थूल, रितु अलोने, लक्की पिंपळे, आदित्य धोटे, आयुष धाकडे, नवज्योत जांभुळे, अमर आमटे यांनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here