Home पुणे वर्तमानपत्र वाचनालयाचे उदघाटन

वर्तमानपत्र वाचनालयाचे उदघाटन

123

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

 पुणे(दि.28नोव्हेंबर):-दौंड रेल्वे स्थानक परिसरात ७३ व्या संविधान दिनाचे औचित्य साधून छत्रपती राजर्षी शाहु महाराज रिक्षा संघटना रेल्वे स्टेशन दौंड मार्फत मोफत वर्तमानपत्र वाचनालय सुरू करण्यात आले. या वर्तमानपत्र वाचनालयाचे उदघाटन दौंड रेल्वेचे सिटीआय ( टीसी ) अधिकारी बी डी तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज रिक्षा संघटनेचे पदाधिकारी संजय आयरल्लू यांच्या संकल्पनेतून हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला स्तंभ लेखक श्याम ठाणेदार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

त्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व संविधानाच्या उद्दीशकेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी स्तंभ लेखक श्याम ठाणेदार यांनी वाचन का आवश्यक आहे? वाचनाचे फायदे काय ? याविषयी मार्गदर्शन केले तर उदघाटक तिवारी साहेब यांनी संविधान दिनाविषयी माहिती सांगितली. छत्रपती राजर्षी शाहू महाराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुभाष गायकवाड यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संजय आयरल्लू यांनी वाचनालयाची संकल्पना स्पष्ट करून सांगितली. सध्याच्या धकाधकीच्या युगात रिक्षा चालकांना वाचनास वेळ मिळत नाही.

रिक्षा स्टँडवरच वाचनालय सुरू केल्याने रिक्षा चालकांना फावल्या वेळेत वाचन करता येईल त्यामुळे रिक्षा चालकांची वाचनाची तहान भागेल आणि त्यांचे ज्ञान वृद्धिंगत होईल तसेच या वाचनालयाचा प्रवाशांनाही लाभ होईल असे मत संजय आयरल्लू यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जावेद सय्यद उपाध्यक्ष, दौंड महा रिक्षा संघ यांनी केले तर सूत्रसंचालन जितेंद्र डेंगळे यांनी केले. आभारप्रदर्शन जालिंदर शिंदे यांनी केले यावेळी साईराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष उत्तम लोंढे, बाबासाहेब कोरी, संजय डागोर उपस्थित होते. यावेळी संजय पवार, विजय नरवडे, शहनवाज शेख, नवनाथ शिंदे, ठाकोर साहेब, संतोष बाडकर, भाऊ थोरात, शहाबाज शेख, शेखर लोडी आदी मान्यवर तसेच रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी संविधानाच्या उद्दीशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here