Home महाराष्ट्र दिक्षा सोनावणे यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार

दिक्षा सोनावणे यांना महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार

119

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगाव(दि.27नोव्हेंबर):-सामाजिक कार्यकर्त्या दिक्षा शैलेश सोनावणे यंदाच्या महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. शुक्रवारी २५ नोव्हेंबरला मानखुर्द येथे पार पडलेल्या एम.एफ.ए.फिल्मस इंटरनॅशनल प्रस्तुत महाराष्ट्र आयकॉन अँवार्ड्स २०२२ या सोहळ्यात आयोजक फैसल खान यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच सावली सेवा फाउंडेशन ही सामाजिक संस्था देखील पुरस्काराची मानकरी ठरली.

दिक्षा सोनावणे यांनी शिक्षण,रोजगार,आरोग्य,पर्यावरण,सांस्कृतिक,कला,क्रीडा, मनोरंजन,विज्ञान,तंत्रज्ञान,नागरीकांच्या रेशनिंग विषयक हक्कांची जनजागृती करणे आदी विषयांसह महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.महिला सक्षमीकरण व महिलांच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करून त्यांना सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रामधे सबळ बनवण्याचे माझे ध्येय आहे.

या घटकांच्या कल्याणासाठी सदैव काम करत राहणार असल्याचे दिक्षा सोनावणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.या पुरस्कार सोहळ्यास समाजसेवक महेंद्र वर्मा,वरिष्ठ पत्रकार मुकेश शाही व वरिष्ठ पत्रकार आसिफ अली,सामाजिक कार्यकर्ता निलेश पाटील व समाजसेवक भाऊसाहेब कातुरे तसेच पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते अशी माहिती सुरजभैय्या यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here