✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.27नोव्हेंबर):- गडचिरोली जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अंतर्गत जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येथे सामूहिकरीत्या प्रास्ताविक चे वाचन करून संविधान दिन साजरा करण्यात आले. सोबतच संविधान निर्मात्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, प्रदेश काँग्रेस प्रतिनिधी प्रा.समशेर खान पठाण, सहकार सेल अध्यक्ष शामराव चापले, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसागडे, ओबीसी सेल अध्यक्ष पांडुरंग घोटेकर, रोजगार सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल पंजवानी, हरबाजी मोरे, सुभाष धाईत, रमेश चौधरी, सुरेश भांडेकर, संजय चन्ने, दीपक रामने, आय.बी.शेख, महादेव भोयर, अरुण पुण्यप्रेड्डीवार, माजिद सय्यद, चारुदत्त पोहणे, दत्तात्रय खरवडे, सुधीर बांबोडे, अमजद खान, सुरज मडावी, राजेंद्र मेश्राम, कृष्णा झजाळ, अविनाश बांबोडे, मिलिंद बारसागडे, भैयाजी मुद्दमवार, जावेद खान, मयूर गावतुरे, कल्पना नंदेश्वर, वर्षा गुलदेवकर, सुवर्णा उराडे, पौर्णिमा भडके, सुनीता रायपुरे, गीता वाडके, संगीता सोनुले, आशा मेश्राम, संघमित्रा राजवाडे, सुमन उंदीरवाडे अहिल्या सहारे, संतोष सूत्रपवार सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व संविधान प्रेमी उपस्थित होते.