Home महाराष्ट्र चार्वाक वन येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिनाचे आयोजन

चार्वाक वन येथे महात्मा ज्योतिबा फुले स्मृतीदिनाचे आयोजन

160

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.24नोव्हेंबर):-तालुक्यातील चार्वाक वन येथे म. ज्योतिबा फुले समता विचार मंच बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था पुसद यांच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी साजरा करण्याचे आयोजन करण्यात आले आहे .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून ॲड .के.ई.हरिदास अध्यक्ष सत्यशोधक समाज प्रतिष्ठान औरंगाबाद उपस्थित राहणार आहेत .

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शाम उर्फ पुर्णचंद्र मेश्राम लेखक व विचारवंत आकाशनगर नागपूर, विनायक कांडलकर जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज अमरावती, डॉ. सुधाकर डेहानकर विदर्भप्रदेश सचिव सत्यशोधक समाज अमरावती, आनंद भगत उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा यवतमाळ तसेच यावेळी फुले ,शाहू,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात येईल. सत्कारमुर्ती म्हणून गोकुलदास वंजारे आष्टा ता.किनवट जि.यवतमाळ उपस्थित राहतील.

गोवरचा विळखा वाढतोय….

हा कार्यक्रम २८ नोव्हेंबर २०२२ सोमवार रोजी सकाळी ठीक ११ वाजता होणार आहे. यानंतर स्नेहभोजन होईल. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष धम्मभुषण ॲड .अप्पाराव मैंद यांनी केले आहे.

अब तेरा क्या होगा रे बुलडोजर!

स्वयंघोषित साईबाबांचे अवतार!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here