Home बीड विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वेटर व ब्लॅंकेटचे वाटप

विजयसिंह पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांना स्वेटर व ब्लॅंकेटचे वाटप

251

🔸दिव्यांगाना मिळाली थंडीत मायेची उब ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पुढाकार

🔹दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस करता आला याचे मनाला खरे समाधान वाटले- रणवीर पंडित

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.21नोव्हेंबर):-जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.विजयसिंह शिवाजीराव पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व जय भवानी कामगार कॅटींग, शिवाजीनगर गढी यांच्या वतीने सोमवार दि.२१ नोव्हेंबर रोजी शहरातील कै.भगवानराव ढोबळे मूकबधिर व मतिमंद निवासी विद्यालयातील ५० दिव्यांग विद्यार्थ्यांना थंडीत मायेची उब देण्यासाठी स्वेटर व उबदार ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

न्यूज पोर्टलला शासनमान्यता!

यावेळी युवा नेते पृथ्वीराज जयसिंह पंडित, युवा नेते रणवीर अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर पिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका उपाध्यक्ष दत्ताभाऊ दाभाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय पवार, शेख शारेफभाई, जय भवानी कामगार कॅटींगचे शुभम कदम यांच्या पुढाकारातून मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांना स्वेटर व बैंल्केट वाटप करण्यात आले. यावेळी अमित वैद्य, युवराज नागरे, संग्राम पंडित, अनिल गोंजारे,जीवन साळवे, उदय पानखडे, युवराज कुडके, जयसिंग माने, शुभम टाक, वैभव दाभाडे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

जिगरबाज…!

दिव्यांग विदयार्थ्यांसोबत वाढदिवस करता आला याचे मनाला खरे समाधान वाटले- रणवीर पंडित
————————–
मा.विजयसिंह राजे पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग विदयार्थ्यांना थंडीत मायेची उब देण्यासाठी स्वेटर व ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. खऱ्या अर्थाने वाढदिवसानिमित्त त्यांना याच शुभेच्छा होय. वाढदिवसानिमित्त सामाजिक आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात यावेत. आज मला या दिव्यांग विदयार्थ्यांसोबत वाढदिवस करता आला याचे मनाला खरे समाधान वाटले.असे मत युवा नेते रणवीर पंडित यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here