Home महाराष्ट्र बाळूच्या खांद्यावर कामाचा भार; तो बनला कुटूंबाचा आधार

बाळूच्या खांद्यावर कामाचा भार; तो बनला कुटूंबाचा आधार

272

🔹गवंडी काम करून कुटूंबाचा उदरनिर्वाह

✒️शेख आतिख(तलवाडा प्रतिनिधी)

तलवाडा(दि.19नोव्हेंबर):-घरची परिस्थिती हलाखीची असल्यावर कुटूंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रश्न डोळ्यासमोर उभा असतो आणि दोन वेळच्या अन्नासाठी धावपळ करावी लागत असल्याचे आपण पाहत आहोत परंतु परिस्थिती कशीही असली तरी अंगात स्वाभिमान आणि काम करण्याची धमक असेल तर मेहनत करून आपण स्वबळावर कुटूंब सावरू शकतो ही इच्छाशक्ती मनात कायम असावी लागते आणि हीच इच्छामनात बाळगून बाळु गिरी या युवकाने आजवर परिश्रम करत आपल्या कुटूंबाला सांभाळत आपल्या आयुष्यातील खडतर प्रवासाचे अंतर पार करत आहे.सर्व कुटूंबाची सांभाळण्याची जबाबदारी ही बाळु गिरी यांच्यावर असून तो ती जबाबदारी सक्षमपणे सांभाळत असल्याने अनेक तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपले काम हेच दैवत समजून जीवन जगावे अशी इच्छा मनाशी बाळगायला हरकत नाही.

गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील रहिवासी असलेला आणि गोसावी समाजात जन्माला आलेला “बाळु” बाळु चे प्राथमिक शिक्षण हे तलवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत फक्त नावालाच झाले परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे मोफत शिक्षण ही बाळूला शिकता आले नाही घरची गरिबी ही पाचवीला पुंजल्यालीच जणू नशीब घेऊन आली असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी जीवणाची फरफट वाट्याला आली,वडिलांचे छत्र डोक्यावरून गेल्या नंतर सर्व कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा भार एकट्याच्या खांद्यावर पडला आणि आयुष्याची खरी कसरत सुरू झाली ती आजही सुरूच आहे,हाताला मिळेल ते काम करून त्या कामाच्या कमाईतून आलेल्या पैशांनी घर चालवण्यास सुरुवात झाली अनेक कामे केली गाव सोडून बाहेरगावी जाण्याची वेळी बाळु वर आली.

ज्या ठिकाणी कामासाठी गेला तेथे प्रामाणिक पणे काम आणि मेहनत करून साधे जीवन जगत त्यांनी कुटूंबाचा गाडा चालवला,आई ला सांभाळत जीवनात जोडीदार आल्यावर त्यांना ही जपण्याची जबाबदारी बाळु वर पडली परंतु स्थिर काम नसल्यामुळे जीवनाची फरफट होत आहे ही जाणीव झाल्यावर तलवाडा गावातच काम करून जीवन जगण्याचे ठरवून गवंडी काम करण्यास सुरुवात केली आगोदर ठेकेदाराच्या हाताखाली काम केले व पुढे स्वतःच काम शिकून कामे घेतली आणि केली आजही अनेक कामे हाती घेतलेले असून मेहनत करत स्वतःच्या खांद्यावर कामाचा भार घेत कुटूंबाचा आधार बनला आहे,मितभाषी स्वभाव आणि हरहुन्नरी आणि मेहनती असल्यामुळे सर्वांशी जुळवून घेत आपलेसे करण्याची कसब बाळु च्या अंगी आहे,घरची परिस्थिती गरीब असली तरी मनाने श्रीमंत आसनारा बाळु गिरी आज तलवाड्यात आपल्या कामाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी धरपड करत असून स्वकर्तुत्वाने आणि स्वबळावर युवकांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभे रहावे अशी मनोकामना बाळु यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here