Home महाराष्ट्र राष्ट्रीय लोक अदालतमधील सुरू असलेले प्रकरण ६ हजार २६९ पैकी ८५२ तडजोड...

राष्ट्रीय लोक अदालतमधील सुरू असलेले प्रकरण ६ हजार २६९ पैकी ८५२ तडजोड करून निकाली काढण्यात आले..!!

110

🔹सहा कोटी ७९ लाख ४९ हजार १११ इतकी रक्कम आपसी तडजोडीतुन वसुल

✒️बळवंत मनवर(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.14नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये दि.१२ नोव्हेंबर २०२२ रोजी राष्ट्रीय लोक अदालत तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-१, व्हि.बी. कुळकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सदर राष्ट्रीय लोकअदालतमध्ये पॅनल क्रं.१ वर पॅनल न्यायाधीश म्हणून वसंत कुळकर्णी, जिल्हा न्यायाधीश-१, पॅनल क्रं. २ वर निता मखरे जिल्हा न्यायाधीश- २, पॅनल क्रं. ३ वर एन. जी. व्यास, सहदिवाणी न्यायाधीश क. स्तर, पॅनल क्रं. ४ वर डि.जी. मस्के २ रे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पॅनल क्रं.५ वर एस. एन. नाईक सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरच्या पॅनल न्यायाधीश म्हणून हजर होते.

कनिष्ठ स्तरचे सह दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश व्हि. एस. वाघमोडे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तरच्या श्रीमती एस. जी. जाधव,पाचवे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जि. एस. वर्पे,६ वे सह दिवाणी न्यायाधीश क.स्तरचे व्हि. बी. चव्हाण, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तरचे झेड.ए. कादरी तसेच जिल्हा न्यायालय-१, पुसद येथील अधिक्षक व्हि.आर. बंगाले, विधीज्ञ ॲड. महेश पाठक,ॲड. सुशिला नरवाडे,ॲड. अंबीका जाधव, ॲड.सुचिता नरवाडे, ॲड.आर. एन. जाधव व इतर विधिज्ञ आणि न्यायालयीन कर्मचारी हजर होते.सदर लोकअदालतमध्ये वादपूर्व प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात दावे, चेक बाऊन्स प्रकरणे, वाहन कायदा संदर्भाचे प्रलंबित असलेले व इतर प्रकरणे मिळून एकूण ६ हजार २६९ ठेवण्यात आलेले असून त्यापैकी एकूण ८५२ प्रकरणे समझौताद्वारे निकाली काढण्यात आलेत.

निकाली काढलेल्या प्रकरणी एकूण रक्कम रु. ६ कोटी ७९ लाख ४९ हजार १११ इतकी रक्कम आपसी तडजोडीतुन वसुल करण्यात आलेली आहे.सदर लोक अदालतीत विधी सेवा समितीचे आर. व्ही. पेटकर, एस. जी. मदणे,डी. डी. टाले,पि.ए. कोयरे,निलेश एम. खसाळे व इतर ब-याच संख्येने न्यायालयीन कर्मचारी उपस्थित राहून लोक अदालतीला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here