Home महाराष्ट्र शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे त्याग मूर्ती रमाई यांची भाची शुभांगीताई धोत्रे...

शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे त्याग मूर्ती रमाई यांची भाची शुभांगीताई धोत्रे यांची भेट 

190

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.30डिसेंबर):-दिनांक 26 डिसेंबर 2025 ला सायंकाळी 5 वाजता त्यागमूर्ती माता रमाई यांचा भाऊ शंकर यांची मुलगी शुभांगीताई धोत्रे यांनी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे भेट दिली. यावेळी त्यांचे शांतीवन बुद्ध शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध यांनी त्यांचा शाल ,पुष्पगुच्छ व तथागताची प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार केला. सर्वप्रथम शुभांगी ताई यांनी तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन केले. प्रास्ताविक पत्रकार संजीव भांबोरे यांनी केले.

त्यानंतर प्रबोधनकार राजकुमार वाहने यांनी त्याग मूर्ती रमाई यांचे गीत सदर केले. यावेळी उपस्थित सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना शुभांगीताई म्हणाल्या की ,शांतीवन बुद्ध विहार हे महाराष्ट्रातील सर्व धर्मीय विहार असून या विहारांमध्ये संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,संत तुकाराम ,छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अशोक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,तथागत गौतम बुद्ध, शिवली बोधी , पूर्णाकृती पुतळे असून असे विहार महाराष्ट्रात कुठेही नाही असा त्यांनी आवर्जून देखील केला. व समाधान व्यक्त केले.

यावेळी रमाई ट्रस्टच्या वतीने जीवनबोधी बौद्ध यांचा पुष्पगुच्छ ,रमाई पुस्तक व रमाई कॅलेंडर भेट देऊन सत्कार करण्यात आला. मूर्तिकार राजकुमार वाहने यांचा जीवन बोधी यांच्या हस्ते शाल ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांच्यासोबत सुरेश महाडिक, सुषमाताई वाघचौरे ,विजेंद्र वाघचौरे ,सीमा वाघचौरे, सोहम वाघचौरे ,सारिका वाघचौरे, वनिता उके ,मान्यता पवार ,राजकुमार वंजारी उपस्थित होते. राजकुमार वाहने, प्रशांतकुमार बडोले,आशिष मेश्राम, गुलाब गोडसे, समाधान तिरपुडे यांनी सहकार्य केले. यावेळी बऱ्याच प्रमाणात बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here