Home महाराष्ट्र मोहाडी तालुक्यातील कान्हाळगाव येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे 10 व 11 जानेवारीला आयोजन 

मोहाडी तालुक्यातील कान्हाळगाव येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे 10 व 11 जानेवारीला आयोजन 

103

✒️संजीव भांबोरे(विशेष प्रतिनिधी)

भंडारा(दि.30डिसेंबर):-महाराष्ट्र शाहीर परिषद पुणे संलग्नित भंडारा जिल्हा सर्व स्तरीय कलाकार संस्था तुमसर तालुका शाखा मोहाडी च्या वतीने जिल्हास्तरीय सांस्कृतिक भव्य महोत्सवाचे आयोजन मोहाडी तालुक्यातील कान्हाळगाव येथे 10 व 11 जानेवारी 2026 ला रोज शनिवार व रविवारला सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा च्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मोहाडी तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते होईल .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून भंडारा पवनी विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर उपस्थित राहतील. प्रमुख अतिथी म्हणून चरणभाऊ वाघमारे माजी आमदार ,जगदीश शेंडे सभापती पंचायत समिती मोहाडी ,देवाभाऊ इलमे जि प सदस्य, उमेश पाटील जि .प. सदस्य ,दिलीप सारवे जि. प .सदस्य, दीपक सूचक, नरेश ईश्वरकर सभापती शिक्षण विभाग जि प भंडारा, मदन शेंडे ,ज्योती वाघाये, जोगेश्वरी मेश्राम, नरेश ईश्वरकर व संकेत मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. 10 जानेवारीला सायंकाळी 7 वाजता राष्ट्रीय संगीत तमाशा शाहीर दुर्वास ,साथी मारुती , शाहीर उदेलाल पटले यांचा राष्ट्रीय संगीत खडा तमाशा होईल. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन गणेशराम देशमुख ,वसंत कुंभरे ,घनश्याम पठारे ,मधुकर फुलबांधे ,मंगेश मानापुरे, अशोक बुधे, गीता रामटेके ,नरेश देशमुख, राजूभाऊ गजभिये, मनराज भुरे ,मारुती निंबार्ते,श्रीमती कल्पना कामथे,प्रभाताई पाटील ,शिला झंजाळ, यांनी केलेली आहे. अधिक माहिती करिता मारुती निंबार्ते मोबाईल क्रमांक 86 69 40 97 42 ,दुर्वास बावणे मोबाईल क्रमांक 90 11 14 13 77, दुर्गादास बावणे मोबाईल क्रमांक 95 79 97 0227 , प्यारेलाल मोबाईल क्रमांक 86000 95 808, भरत नागोसे मोबाईल क्रमांक 99 23 84 65 35 ,निलकमलबाई गोंडाणे मोबाईल क्रमांक 96 23 63 97 56, सुषमा टिचकुले मोबाईल क्रमांक 91 45 25 04 26 ,क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here