Home खेलकुद  हॉकी स्पर्धेत श्री संत जनाबाई महाविद्यालयाचा तृतीय क्रमांक

हॉकी स्पर्धेत श्री संत जनाबाई महाविद्यालयाचा तृतीय क्रमांक

86

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

गंगाखेड(दि.27डिसेंबर):- येथील श्री संत जनाबाई महाविद्यालय कनिष्ठ व वरिष्ठ विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करून महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेचा गौरव वाढवला आहे. दिनांक २४ डिसेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड यांच्या अंतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन सेंट्रल झोन हॉकी क्रीडा स्पर्धेत श्री संत जनाबाई महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागाच्या मुलांच्या हॉकी संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला.

या संघाचे कर्णधार सुधीर कळसकर,तर उपकर्णधार म्हणून गोविंद गेजगे व प्रताप भावे यांनी संघाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

परभणी जिल्ह्यातून हॉकीसारख्या राष्ट्रीय खेळात शालेय व विद्यापीठ स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणारा श्री संत जनाबाई महाविद्यालयाचा संघ यावर्षीही तृतीय क्रमांक पटकावून विद्यापीठ पातळीवर आपली ठसठशीत छाप उमटवली आहे. विशेष म्हणजे, या संघातील दोन विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी झाली आहे. याचबरोबर, जळगाव येथे पार पडलेल्या खेलो इंडिया अस्मिता किक बॉक्सिंग लीग स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींनी उल्लेखनीय यश मिळवले.तनुजा खोडके व गीता म्हस्के यांनी सुवर्णपदक, तर समीक्षा अवचार हिने रौप्यपदक पटकावून महाविद्यालयाच्या क्रीडा यशात भर घातली.

या सर्व यशामागे कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा प्राध्यापक प्रा.चैतन्य पाळवदे यांचे प्रशिक्षण मोलाचे ठरले.त्यांनी किक बॉक्सिंग खेळाडूंना प्रशिक्षण देण्याबरोबरच वरिष्ठ महाविद्यालयाच्या हॉकी संघालाही परीक्षा व स्पर्धात्मक प्रशिक्षण दिले.या संपूर्ण क्रीडा उपक्रमांचे मुख्य मार्गदर्शन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक व उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत सातपुते यांनी केले, तर संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा.पाळवदे यांनी जबाबदारी सांभाळली.या सर्व विजयी खेळाडू व क्रीडा प्राध्यापकांचा श्री संत जनाबाई शिक्षण संस्थेचे सचिव ॲड.संतोष मुंडे,प्राचार्य बी.एम.धूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ.आत्माराम टेंगसे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संतोष गायकवाड,कार्यालयीन अधीक्षक भारत हत्तीआंबिरे सर्व संस्था पदाधिकारी व प्राध्यापकांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here