Home Breaking News निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तीन दिवस मद्यविक्री बंद

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तीन दिवस मद्यविक्री बंद

105

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.30नोव्हेंबर):- चंद्रपूर जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूक होत असून 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात सदर निवडणुका पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक असलेल्या क्षेत्रात सलग तीन दिवस म्हणजे 1, 2 व 3 डिसेंबर 2025 रोजी मद्य / बिअर / ताडी विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, मूल, राजूरा, घुग्घुस, गडचांदूर, नागभीड, चिमूर या नगर परिषदेत तर भिसी येथील नगर पंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने मतदानाच्या पुर्वीचा दिवस म्हणजे 1 डिसेंबर, मतदानाचा दिवस 2 डिसेंबर आणि मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबर, हे तिनही संपूर्ण दिवस मद्य / बिअर / ताडी विक्री बंद ठेवण्यात येईल. या आदेशाचा व नियमावलीतील तरतुदींचा भंग करणा-या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या आदेशात नमुद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here