

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.29नोव्हेंबर):- गडचिरोली जिल्ह्यातील येवलीचे दुग्ध व्यावसायिक श्री चोखाजी धर्माजी बांबोळे यांच्या मातोश्री लिलाबाई धर्माजी बांबोळे यांनी ३५ वर्षांपूर्वी आपल्या पतिच्या निधनानंतर राष्ट्रीय समविकास योजनेतुन एक म्हैस घेऊन आपला दुग्ध व्यवसाय सुरु केला.त्याच धंद्यावर मुलांचा सांभाळ,शिक्षण देऊन गावात चांगला व्यवसाय सिध्द करून दाखविले
आईच्या नंतर मुलगा चोखाजी बांबोळे यांनी पुन्हा शासकीय योजनेचा लाभ घेऊन २ म्हैस व १ गाय मिळवली आणी स्वतः चा दुग्ध व्यवसाय जोमाने सुरू करुन जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, जज, मुख्य कार्यकारी अधिकारी, एस पी , व अन्य अधिकारी यांचे घरी १० वर्षांपर्यंत सायकल ने दुध पुरवठा केला याची माहिती जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भुयार सर येवली येथिल पशुवैद्यकीय दवाखाना ला आले असता कर्मचाऱ्यांकडून माहिती होताच मातोश्री लिलाई दुग्ध उत्पादन केंद्र येवलीस भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली
सदरील केंद्रास भेटीत रोहयोच्या माध्यमातून गोठा बांधला दिसला तसेच गाय, म्हेस, शेळी पाहून जिल्हयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भुयार सर आनंदीत झाले
डॉ ठवरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी गडचिरोली, डॉ इंकार पशुवैद्यकीय अधिकारी येवली, श्री चौधरी सहाय्यक पशुवैद्यकीय दवाखाना येवली, श्री युवराज भांडेकर सरपंच येवली यांच्या उपस्थितीत तरुणांचे आधारस्तंभ सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रा प सदश्य चोखाजी बांबोळे यांनी रोज १२५ ते १५० लिटर दुध रोज विक्री होतो आहे अशी माहिती दिली असुन पुढे शेणापासून उत्कृष्ट खत, शेणापासून दिवे, छोट्या गोवर्या, गोमूत्र मार्केट मध्ये आणणार असल्याचे सांगितले
सन २०२२-२३ मध्ये पंचायत समिती गडचिरोली द्वारे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी, चिमुर – गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अशोकजी नेते,पं स सभापती श्री इचोडकर, उपसभापती श्री दशमुखे, गटविकास अधिकारी श्री माहोर साहेब यांच्या हस्ते उत्कृष्ट दुग्ध व्यावसायिक म्हणून गौरविण्यात आले हे विशेष











