Home Breaking News म्हसवड नगरपरिषद निवडणूक 2025 अनुषंगाने म्हसवड पोलिसांचा गरुडा कोयता गॅंगला दणका

म्हसवड नगरपरिषद निवडणूक 2025 अनुषंगाने म्हसवड पोलिसांचा गरुडा कोयता गॅंगला दणका

89

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

🔺म्हसवड शहरातून काढली आरोपीची धिंड

 म्हसवड(दि.26नोव्हेंबर):-सोशल मीडियावर नायक नही खलनायक हु मै तसेच इतर प्रक्षोभक गाण्यांचे हत्यारांसह व्हिडिओ व्हायरल करून दहशत करणाऱ्या आरोपींवर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे कारवाई करून सदर आरोपीची म्हसवड शहरातून धिंड काढली. 

 पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे म्हसवड पोलीस स्टेशन यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पळसावडे व म्हसवड येथील काही मुलांनी सोशल मीडियावर हत्यारांचे व्हिडिओ अपलोड करून त्यावर नायक नही खलनायक हु मे अशा पद्धतीचे प्रक्षोभक गाणी लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी गुन्हे प्रकटीकरण स्टाफसह तात्काळ या आरोपींची माहिती घेऊन हे आरोपी म्हसवड, पळसावडे या परिसरात त्यांच्या मोटरसायकलला घातक हत्यारे लावून दहशत करत असल्याबाबत माहिती मिळाल्यामुळे तात्काळ रवाना होऊन या आरोपींचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले असता या आरोपींकडे तलवारी, कोयते यांसारखी घातक हत्यारे मिळून आलेली आहेत. त्यामुळे या आरोपींवर म्हसवड पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून म्हसवड नगरपरिषद निवडणूक 2025 अनुषंगाने ही मोठी कारवाई समजली जात आहे.

 आज रोजी या आरोपींनी ज्या परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या परिसरात या आरोपींना पोलीस स्टाफ सह घेऊन जाऊन दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने पंचनामे त्याचबरोबर आरोपींनी लपवून ठेवलेली ईतर हत्यारे या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर अशा पद्धतीने रिल्स व्हायरल करणे हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तसेच दहशतीचे व्हिडिओ बनवून अपलोड करणे हे सुद्धा बेकायदेशीर आहे. त्यामुळे या झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने सर्व तरुण पिढीला आवाहन करण्यात येते की कोणीही अशा पद्धतीचा प्रकार करू नये, हे सर्व आरोपी यांनी गरुड गॅंग नावाची गॅंग स्थापन केलेली होती आणि या गॅंगमध्ये त्यांनी अल्पवयीन मुलांचा सहभाग करायला चालू केलेले होते व त्यांना गुन्हेगारी जगताबद्दल आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात होता. या कारवाईमुळे गरुड गॅंगचा बिमोड करण्यात आलेला आहे. या चारही आरोपींना या गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेले असून पुढील अधिक तपास चालू आहे.

 सदर गुन्ह्यांतील आरोपींची नावे उत्कर्ष भागवत जानकर,

 सिद्धार्थ किरण रावळ, शंतनु विकास शीलवंत, आर्यन राहुल सरतापे

 सदरची कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, मैना हांगे,रूपाली फडतरे, अमर नारनवर, जगन्नाथ लुबाळ, अभिजीत भादुले, नवनाथ शिरकुळे, राहुल थोरात, संतोष काळे, धीरज कवडे, सतीश जाधव, हर्षदा गडदे यांनी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here