Home यवतमाळ शहीद भगतसिंग नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात...

शहीद भगतसिंग नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

109

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दि.15 ऑगस्ट) येथील शहीद भगतसिंग नगर परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा जी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नगर परिषदामध्ये पटसंख्या बाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे, या शाळेत देशाचा 76 वा स्वातंत्र्य दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला.

शालेय ध्वजारोहण शाळेचे मुख्याध्यापक आशिष राठोड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनीलभाऊ नरवाडे, उपाध्यक्ष श्री माधव खिल्लारे, ॲड. जयश्री गवळे, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर, श्यामभाऊ धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) शाळेतील समस्त शिक्षक व कर्मचारीवर्ग व मोठ्या प्रमाणात पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यावर्षी शाळेतील जवळपास सर्वच वर्गासाठी विद्यार्थी कमाल प्रवेश मर्यादा ओलांडली ज्यामुळे शाळेमध्ये भरगच्च विद्यार्थी संख्या दिसून आली.

शाळेतील शिक्षक – शिक्षिका यांच्या कामावर पालकांचा असणारा विश्वास आणि शाळेला मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता शहीद भगतसिंग नगर परिषद शाळा ही जिल्ह्यातील सरकारी शाळापुढे एक आदर्श शाळा म्हणून उभरत आहे.
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना पत्रकार सिद्धार्थ दिवेकर व इतर पालकांनी बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन चौधरी सर यांनी केले तर बँड पथकाचे नेतृत्व सुनिल कवडे सर यांनी केले. याप्रसंगी बुरफुले सर यांनी विद्यार्थ्यांच्या संगीत चमुसह सुरेख असे देशभक्तीपर गीतांचे गायन केले.
विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या औचीत्याने मराठी, हिंदी तसेच इंग्रजी भाषेतून उस्फुर्त भाषणे दिली.
सदर प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप पालकांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here