पदग्रहण अधिकारी लॉ.राहुल औसेकर यांनी दिली शपथ
अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनीधी)
गंगाखेड(दि.7ऑगस्ट);-शहरातील राजेश्वर फंक्शन हॉल येथे दि.6 (शनिवार) रोजी लॉयन्स क्लब गंगाखेड गोल्ड सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला अध्यक्षपदी लॉ.श्रीधराचार्य जोशी, सचिवपदी लॉ.भगत सुरवसे,कोषाध्यक्षपदी लॉ.मकरंद चिनके यांची निवड करण्यात आली सर्व पदाधिकाऱ्यांना उपप्रांतपाल लॉ.राहुल औसेकर यांनी पदग्रहणाची शपथ दिली.सदरील कार्यक्रमास मुख्य आकर्षण युवकांना घडविणारे वक्ते विठल कांगने सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे रिजन चेअरपर्सन लॉ.डॉ.श्रीकांत मनियार, पदग्रहण अधिकारी लॉ.राहुल औसेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांची उपस्थिती होती.
यावेळी लॉ.डॉ.मनीयार यांनी फ्लॅश नावाच्या ब्रीद वाक्याचे महत्व सर्व सदस्यांना समजाऊन सांगितले सदरील कार्यक्रमास झोन चेअरपर्सन लॉ.अतुल गंजेवार,कॅबिनेट ऑफिसर लॉ. लॉ.गोविंद रोडे,लॉ.संजय सुपेकर,जगदीश तोतला, प्रथम उपाध्यक्ष लॉ.अभिनय नळदकर,लॉ.विष्णू मूरकुटे,लॉ.प्रदीप गुंडाळे,लॉ.मदन शिंदे,लॉ.संतोष टोले, सहसचिव लॉ.बाळासाहेब यादव,सहकोषाध्यक्ष लॉ.अरविंद लांडगे, टेमर लॉ.प्रकाश डीकळे, संचालक लॉ.नागेश केरकर,लॉ.बंडू घुले,लॉ.सुभाष भारती,लॉ.गोपाळ मंत्री,लॉ.प्रदीप शेठ,लॉ.अंबादास राठोड,लॉ.धोंडूतात्या शेटे आदींची उपस्तिथि होती. नवीन सदस्या मधी लॉ.अतुल तूपकर,लॉ.सोपान गिराम,लॉ.बाळासाहेब मुंडे,लॉ.संदीप राठोड,लॉ.गजानन जोशी,लॉ.संदीप उदावंत,नागेश बोरीकर,लॉ.देवानंद जोशी, लॉ.महेमुद शेख यांच्यासह आदीं सदस्यानी शपथ घेतली
कार्यक्रमाचे सूत्र संचालन लॉ.विष्णू मूरकुटे यांनी केले तर आभार लॉ.भगत सूरवसे यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी लॉ.उमेश पापडू,लॉ.वीठल शिंदे,महेंद्र वरवडे,लॉ.अभिजीत चौधरी,लॉ.महेंद्र कांबळे आदींनी परिश्रम घेतले




