Home महाराष्ट्र न्यायलयातील सेफ्टी टॅंक मध्ये पडलेल्या गाईला एकनिष्ठाने काढले बाहेर

न्यायलयातील सेफ्टी टॅंक मध्ये पडलेल्या गाईला एकनिष्ठाने काढले बाहेर

85

✒️खामगाव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

खामगांव(दि.14जुलै):- गौ-सेवेत सदैव अग्रेसर असलेल्या एकनिष्ठा गौ-सेवकांनी सेफ्टी टॅंक मध्ये पडलेल्या गाईला सुखरूप काढले बाहेर सविस्तर घटना अशी आहे की नांदुरा रोड स्थित दिवाणी व फौझदारी न्यायलयातील कंपाऊंडला लागूनच काल दिनांक 13 जुलै रोजी एक गाई खुप जुन्या शेफ्टी टॅंक मध्ये पडली गाई दिसायला चांगली सुंदर आणि मोठी पांढऱ्या रंगाची होती ती स्लॅबच्या मलब्या खाली पडून जखमी अवस्थेत दबून पडलेली होती. या आधी सुद्धा अशीच एक घटना घडली होती.

काही महिन्यापूर्वी सुद्धा अजून एक गाई त्याच सेफ्टी टॅंक मध्ये पडली होती तिला पण एकनिष्ठा गौ-रक्षकांनी आपल्या जिवाची परवा न करता लगेच बाहेर काढुन जिवनदान दिले होते तेव्हा पासून ना दुरुस्त क्षतीग्रस्त अवस्थेत तुटून पडलेल्या सेफ्टी टॅंकची दुरुस्ती करण्यात आली नव्हती. व तसेच न्यायलया कडून तो सेफ्टी टॅंक बुझवल्या गेला नव्हता शेवटी एकनिष्ठा गौ-रक्षकांनी पुढाकार घेऊन क्षतीग्रस्त स्थितीत तुटलेला सेफ्टी टॅंक शेवटी जेसीबी द्वारे बुझविला .

काल दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 1 वाजता ऍडव्होकेट संजय बडगुजर यांनी घटनेची माहिती एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशनला दिली असता गौ-सेवक सुरजभैय्या यादव, गब्बू गुजरीवाल, पवन राठोड, बबलू भगतपुरे, वैभव परदेसी, योगेश पाटील, आदित्य जोशी, पियुष चव्हाण, कार्तिक जोशी, दिलज्योतसिंग संधू, प्रतीक पाटील, लक्ष्मण कान्हेरकर, सोनू थोरात, शुभम देशमुख, एडव्होकेट सुनिल अहिरे आदि लोकांनी गाईला दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले व लगेच गौ-रक्षकांनी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पुढाकार घेतला जेणे करून पुढे अशी घटना घडणार नाही लगेच जेसीबी मशीन बोलावून तो क्षतीग्रस्त असलेला सेफ्टी टॅंक लगेच विझविण्यात आला या गौ-सेवा कार्यासाठी एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे अशी माहिती बबलू भगतपुरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here