Home चंद्रपूर चोर

चोर

198

हातात झोरा मला भिकारी वाटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला
ओरडलो असा फक्त तर्क लावूनी
आंधळे कधीचे त्यांना घाम फुटला

जात बगळ्याची बरी ध्यान करते
गरी कशाला चोचीत मासा मरते
उलट्या पाट्यावर मसाला कुटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

काळ्या मनातले ढोंग पांढरे
लाह्या कुणाला कोण जोंधरे
फुटक्या ढोबरात जाळ पेटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

बुद्ध गेला चोरीला सुन्नी पंढरी
संत उरले नावाला दाढी पांढरी
एकाजागी राहून विठ्ठल गोठला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

जाग्यावर बोंबलुन मेला खरा चोर
चौकीदार ठेवला साऱ्यालाच घोर
बाँब सुतळीचा तो फुसका पेटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

दोन हजार हजाराचे जादू करतो
उभा रांगेत उपाशी विकत मरतो
आंधळे पुतळे तसा जिवंत सुटला
अर्ध्या राती अचानक चोर भेटला

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला , ता . मूल , जि. चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here