Home महाराष्ट्र महिलांनी न घाबरता अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा-पोलीस निरीक्षक...

महिलांनी न घाबरता अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास तात्काळ पोलिसांची संपर्क साधावा-पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर

149

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.2मार्च):- शहरात सध्या अनोळखी महिलांना फोन करून अश्लील संभाषण करत ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण सुरू आहे शहरातील काही महिलांना त्यांचे पती बाहेर कामाला जातात यावर पाळत ठेवून घरी राहणाऱ्या महिलांचा नंबर शोधून त्यांना वेळी अवेळी फोन करून सतवण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळे महिला आपल्या इभ्रतीला घाबरून येणाऱ्या फोनची माहिती लपवतात त्यामुळे फोन करणारा ची हिम्मत वाढते व तो वरचेवर महिलांना फोन करून मनस्ताप देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत आहे.

त्यामुळे अनेक महिलांच्या कुटुंबात कलह निर्माण झाला आहे .व या गोष्टीमुळे अनेक महिलांचे पती आपल्या पत्नीकडे संशयाने बघत आहेत यातून महिलेलाच प्रश्न विचारले जात आहेत की हा कॉल तुलाच कसा काय आला,? याला तू ओळखतेसंच यामुळे अनेक महीलांचे संसार उध्वस्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे महिलांनी न घाबरता अशा अनोळखी इसमांचा फोन कॉल आल्यास ताबडतोब गंगाखेड पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन गंगाखेड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी केले आहे यातील तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव गुप्त ठेवण्यात येईल अशी माहिती वसुंधरा बोरगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे फोन नंबर 112 किंवा पोलिस ठाण्याच्या 8208404359

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here