

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रह्मपुरी(दि.27डिसेंबर):- नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता घेऊन स्पष्ट वर्चस्व मिळवून ब्रह्मपुरीत काँग्रेसने झेंडा रोवला. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुजन समाज पक्षा कडून निहाल अंबर ढोरे यांनी ८३६ मत आपल्या पदरी पाडून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. येत्या काळात नक्कीच निहाल ढोरे ब्रम्हपुरीचा नेता होण्याची चिन्ह दर्शवीत आहेत.
निहाल ढोरे हे कमी वयामध्येच समाज सेवेमध्ये तत्परतेने उभे राहिले. त्यांनी रक्तवीरसेनेची स्थापना करून निशुल्क रक्तदान उपक्रम सुरु केला. कित्येक गरजू रुग्णांना रक्त पुरविण्याचे काम केले. त्यांची धडपड नेहमीच समाज हिताची राहिली. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांच्या कार्याची दखल घेत बहुजन समाज पक्षा कडून निहाल ढोरे यांना नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित करण्यात आले. जिंकले नाही पण ब्रम्हपुरीचा राजकीय मैदान ढोरे यांनी हलवीला. त्यांच्या कार्याची स्पुर्ती पुन्हा त्यांना बळ देणारी ठरत आहे. या छोट्याशा मूर्तीचा कित्येक ब्राम्हपुरीतील राजकारण्यांनी उपोयोग करण्याचा, कमी लेखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची धडपड ही प्रतिष्ठापणाची ठरली. निहाल ढोरे यांना नक्कीच भविष्यात नागरिक आपला नेता मानतील अशी तालुक्यात चर्चा रंगत आहे.











