Home महाराष्ट्र गंगाखेडकरांच्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करत राहणार 

गंगाखेडकरांच्या समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करत राहणार 

80

🔹पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचा निर्धार 

✒️गंगाखेड प्रतिनिधी(अनिल साळवे)मो:-8698566515

  गंगाखेड(दि.27डिसेंबर):- नगर परिषद निवडणुकीत कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी उमेदवाराचा पराभव झाला. जनतेचा कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारत आहोत. हा पराभव दुःखद असला तरी निराशाजनक नाही. शहरातील जवळपास साडेसहा मतदारांच्या मतांचा सन्मान करत शहर विकासाबरोबरच समस्यांची सोडवणूक करण्यासाठी संघर्ष करत राहण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला. 

नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. निवडणूक लढलेले सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात झालेला धनशक्तीचा वापर आणि विरोधकांचा आघाडीच्या उमेदवाराबद्दलचा अपप्रचार या बाबी आमच्या पराभवाची मुख्य कारणे असल्याचे यावेळी यादव, शेख यांनी स्पष्ट केले. अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही कॉंग्रेसच्या उमेदवार उजमामाईण शेख यांना तिसऱ्या क्रमाकांची मते मिळाली. हा सुद्धा आमचा नैतिक विजय असल्याचे ते म्हणाले. 

नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्र यांना तर नगरसेवक पदासाठी विद्यमान आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांना मतदारांनी कौल दिला आहे. या आजी – माजी आमदारांनी आता विरोधासाठी विरोधाचा पोरखेळ न करता शहरविकासासाठी गांभीर्यपूर्वक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. 

युवक कॉंग्रेसचे सचिव सिद्धोधन भालेराव, उमेदवार डिगंबर यादव, दत्ता डहाळे, शेख फेरोज बाबामियां, ॲड. लिंबाजी घोबाळे, प्रतिभाताई वाघमारे, लक्ष्मीबाई आडे, सुनिल आडे, शेख सैफुल्ला आसद, शेख आरबाज अनिस आदि उपस्थित होते. 

*पक्षाकडून अपेक्षित पाठबळ न मिळाल्याची खंत*

असलेली लढाई सहज लढली जाते. प्रसंगी जिंकलीही जाते. पण नसलेली लढाई उभी करून लढणे जास्त अवघड असते. हे अवघड काम आम्ही इमानेतबारे पार पाडले. पण या अवघड लढाईत कॉंग्रेस पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळाले नसल्याची खंत यावेळी गोविंद यादव, युनूस शेख यांनी बोलून दाखवली. असे असले तरीही भविष्यात येवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकाही ताकदीने लढवणार असल्याचे गोविंद यादव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here